google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी..!

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी..!

सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी..!


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कोळे (वाहिद आतार) :-  बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे.ह्या सणाला ' ईद - उल - जुहा असेही म्हणले जाते. बकरी ईद हा सण हा इस्लामिक कॅलेंडर च्या शेवटच्या महिन्यात तीन दिवसांचा सण असतो.

बकरी ईद निमित्त कोळे येथील ईदगाह मैदान च्या ठिकाणी सकाळी दहा वाजता सामुहिक नमाज पठण करण्यात आली.या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 बकरी ईद ची नमाज पठण करण्यासाठी कोळे, गौडवाडी, किडेबिसरी,पाचेगाव,बिहार,उत्तरप्रदेश,बेंगलोर , राजस्थान,कोलकत्ता येथील कामानिमित्त आलेले मुस्लिम कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या बकरी ईद ची सुरूवात ही सामुहिक नमाज पठण करण्यात आली.सांगोला तालुक्यातील कोळे हे गाव अतिशय संवेदनशील असल्याने

 सांगोला पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिकारी श्री.केदार भरमशेट्टी व पोलिस मित्र जूनोनीचे विलास गुळीक हे उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून बकरी ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या व पोलिस अधिकारी भरमशेट्टी साहेबांनी सर्व मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा देऊन

 असेच सांगोला पोलीस स्टेशनला असेच कायमस्वरूपी सहकार्य करा असे आवाहन केले.उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी पोलिस अधिकारी केदार भरमशेट्टी साहेबांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments