google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...युवा डॉक्टरने मोबाईलचा पासवर्ड लिहून संपवले जीवन

Breaking News

धक्कादायक...युवा डॉक्टरने मोबाईलचा पासवर्ड लिहून संपवले जीवन

धक्कादायक...युवा डॉक्टरने मोबाईलचा पासवर्ड लिहून संपवले जीवन


राज्यात आत्महत्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन

 डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली होती. सोलापूर, मुंबई, कोल्हापूर,

 पुणे या सारख्या शहरात देखील अशा घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुणे, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. 

आता नुकतीच एक ताजी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी हॉस्टेलच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

डॉ. श्याम व्होरा (वय 28) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी श्याम यांनी एका कागदावर 

आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ मोबाईलमध्ये लपले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

त्यांनी आत्महत्या का केली? त्यांना कशाचा त्रास होता का किंवा कोणी त्यांना असे करण्यास भाग पाडले का? हे आता मोबाईल तपासल्यानंतरच समोर येईल.

Post a Comment

0 Comments