google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..आदमापूरला देवदर्शनाला जाताना कारला भीषण अपघात; एक ठार. सहा गंभीर सांगोला तालुक्यातील भावीक..

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..आदमापूरला देवदर्शनाला जाताना कारला भीषण अपघात; एक ठार. सहा गंभीर सांगोला तालुक्यातील भावीक..

ब्रेकिंग न्यूज..आदमापूरला देवदर्शनाला जाताना कारला भीषण अपघात;


एक ठार. सहा गंभीर सांगोला तालुक्यातील भावीक..

शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोल्याहून आदमापूरला देवदर्शनासाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली.

 या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले.

ही घटना बुधवारी (दि.२५) पहाटे तीनच्या सुमारास निढोरी -कागल मार्गावरील पिंपळगाव बु.गावाच्या हद्दीत घडली.

या अपघातात राजेश शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर रामचंद्र अशोक शिंदे, मोहन यशवंत शिंदे,अर्जुन भाउसाहेब शिंदे,नवनाथ विलास शिंदे,

 अक्षय महादेव चन्ने, आण्णासो सुखदेव शिंदे हे सहाजण (रा.वाकी घेरडी ता. सांगोला जि. सोलापूर ) गंभीर जखमी झाले. याची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाकी घेरडी (ता. सांगोला जि. सोलापूर) येथील भावीक बुधवारी पहाटे आदमापूरला देवदर्शनासाठी येत होते.

 कागलहून निढोरीच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बुद्रक येथे कार (क्रं एम.एच.१२ एन.पी.९४२४ ) या कारवरील चालकाचा ताबा सुटला. 

व कार झाडाला धडकून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, एकाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

 याप्रकरणी आण्णासो सुखदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र अशोक शिंदे या चालकावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments