google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या दमदार कामगिरीमुळे एका महीलेने पळवून आणलेली पाच वर्षाची चिमुकली सापडली !!

Breaking News

खळबळजनक...सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या दमदार कामगिरीमुळे एका महीलेने पळवून आणलेली पाच वर्षाची चिमुकली सापडली !!


खळबळजनक...सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या दमदार कामगिरीमुळे



एका महीलेने पळवून आणलेली पाच वर्षाची चिमुकली सापडली !! 

सोशल मीडियाचा इफ़ेक्ट;सोलापूर बस स्थानकावरून अज्ञात महिलेने केले होते अपहरण

पंढरपूर : आज सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एका पाच वर्षाच्या चिमुकलीला एका अज्ञात महिलेने अपहरण केले होते. 

सुरुवातीला फुटेजमध्ये ती महीला मोहोळ येथील बस स्थानकावरून उतरून पंढरपूरच्या दिशेने गेली अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोज जिल्हाभरातील सोशल मीडियावर प्रसारित झाले.

      त्यानंतर सर्व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली सर्व बस स्थानक आणि अन्य संपर्क ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली गेली 

आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाने टेक्नोसीवी युगात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत फुटेज तपासून सदर महिला कोणत्या दिशेने गेली असावी याचा पक्का अंदाज बांधला.

सर्वत्र सदर मुलीला शोधण्याची धावपळ होत असल्याचे पाहून त्यानंतर सदर महिलेने आज दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयासमोर सदरच्या मुलीला सोडले

 असून सदरची मुलगी मोडनिंब येथील ग्रामस्थांनी मोठ्या काळजीने तिचे संगोपन करत तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

0 Comments