google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सामूहिक अत्याचार करून नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात घातला, आतडी बाहेर आली त्यानंतर... चीड आणणारी घटना

Breaking News

सामूहिक अत्याचार करून नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात घातला, आतडी बाहेर आली त्यानंतर... चीड आणणारी घटना

सामूहिक अत्याचार करून नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात घातला,


आतडी बाहेर आली त्यानंतर... चीड आणणारी घटना

दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेची पुन्हा एकदा आठवण व्हावी अशी एक संतापजनक घटना समोर आली आहे. 

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका 45 वर्षीय आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीने पोलिसांना सांगितले की, 

अत्याचारानंतर त्याने महिलेच्या गुप्तांगात हात घातला, त्यानंतर तिचे आतडे बाहेर आले आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. खरगोन रेंजचे आयजी सिद्धार्थ बहुगुणा आणि कळवा पोलिस स्टेशनचे प्रभारी

 निरीक्षक जगदीश सिंधिया यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, घटनास्थळावरून कोणताही लोखंडी किंवा लाकडी रॉड सापडलेला नाही. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे.

तिची आतडे बाहेर आली त्यानंतर आरोपीनं...

या प्रकरणात कळवा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जगदीश सिंधिया हे तपास अधिकारी आहेत. हरी (वय वर्षे 40) आणि सुनील (वय वर्षे 35) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हरीने तिच्या गुप्तांगात हात घातला, त्यानंतर तिची आतडे बाहेर आली. 

आरोपीने पुन्हा ते आतडे आत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो तसे करू शकला नाही. गर्भाशयाला कोणतेही नुकसान झालं नसतानाही तिची आतडे बाहेर पडली असल्याचे जगदीश सिंधिया यांनी सांगितले.

पोलिसांनी दिली माहिती

जगदीश सिंधिया यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत आहोत. 

आम्ही पुरावे गोळा करत आहोत. घटनास्थळावरून आम्ही रक्ताने माखलेले बेड रोल जप्त केले आहेत. 

दोन्ही आरोपींना रिमांड वर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालाची प्रतिक्षा आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या

 (BNS) कलम 66 (मृत्यूला कारणीभूत ठरणे), 70 (1) (सामूहिक बलात्कार) आणि 103 (1) (हत्येची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आणि आरोपी कोरकू आदिवासी समुदायाचे आहेत. दरम्यान, 

विरोधी पक्ष काँग्रेसने ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले आहे आणि त्याची तुलना दिल्लीतील 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाशी केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, सामूहिक बलात्काराची घटना जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 90 किमीवर असलेल्या रोशनी पोलीस चौक हद्दीत घडली आहे.

 पिडीत महिलेचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने 2.30 वाजता तिचा मृत्यू झाला. चीड आणणारी ही घटना मध्यप्रदेश मधील खंडवा येथे घडली आहे.

Post a Comment

0 Comments