google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ग्रामिण रुग्णालय येथील चाललेला कमिशनचा बाजार थांबणार का? येथील अधिकारी -कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला अभय कुणाचे?

Breaking News

सांगोला ग्रामिण रुग्णालय येथील चाललेला कमिशनचा बाजार थांबणार का? येथील अधिकारी -कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला अभय कुणाचे?

सांगोला ग्रामिण रुग्णालय येथील चाललेला कमिशनचा बाजार थांबणार का?


येथील अधिकारी -कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला अभय कुणाचे?

सांगोला/करण मोरे: सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी रुग्णालयात येणार्‍या रुग्णाकडुन कमिशनची मागणी करत असल्यामुळे या कमिशन मुळे अ‍ॅम्बुलन्स च्या दरात वाढ होत आहे.

 रुग्णालयात येणार्‍या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.संबधित अधिकारी रुग्णालयात चाललेला कमिशनचा काळाबाजार थांबवणार का?

 ग्रामीण रूग्णालयातील भ्रष्टाचार न थांबल्यास आरोग्यमंत्री सांगोल्यास आल्यानंतर त्यांना नागरीक काय कारवाई करणार याबाबतजाब विचारणार असल्याचे ग्रामीण रूग्णालयात जाणार्‍या त्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.  

सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात एका कर्मचार्‍यांची दादागिरी असल्यामुळे हा कर्मचारी कोणत्याही अधिकार्‍यांना न जुमानता अ‍ॅम्बुलन्सला भाडे दिलेल्या कमिशनची मागणी करत असल्यामुळे हा कर्मचारी 

मीच या रुग्णालयामधील अधिकारी असल्यासारखा वागत असल्यामुळे या कर्मचार्‍यांची गुंडगिरी भाषा वापरुन रुग्णांच्या नातेवाईकांना जे म्बुलन्स मालक कमिशन देतात अशाच म्बुलन्स यांना भाडे देत आहेत.

या कर्मचार्‍यांच्या विरोधात अनेक नागरीकांनी लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकार्‍याकडे दिल्या आहेत अशा कर्मचार्‍याची खातेनिहाय चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. 

हा मुजोर कर्मचारी रुग्णालयात आलेल्या शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत असल्यामुळे काही वेळा नातेवाईकांनी पैसे न दिल्यामुळे अनेक वेळा शवविच्छेदन थांबवले

 असल्याच्या चर्चा तालुक्यातून केल्या जात आहेत मयताच्या टाळु वरचे लोणी खाणार्‍या कर्मचार्‍याला अभय कोणाचे? असा प्रश्‍न तालुक्यातून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

तरी संबंधित अधिकार्‍याने वेळीच दखल घेऊन अशा भ्रष्ट कर्मचार्‍यांची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा 

अन्यथा सांगोला ग्रामीण रुग्णालय विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments