पालकमंत्री महोदयांच्या सांगोल्यातील सत्कार समारंभाने एक आदर्श घालुन दिला -भाई चंद्रकांत सरतापे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
काल परवा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयाभाऊ गोरे साहेब हे नागरी सत्कार स्विकारण्यासाठी सांगोला येथे आले होते.ते काही कारणास्तव रात्री उशीरा म्हणजे रात्री साडे आठ वाजता आले ..
व एक दोन ठिकाणचे कार्यक्रम उरकुन ते रॅलीच्या माध्यमातुन सभास्थळी जात असताना स्व.आबासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन स्व आबासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सभास्थळी
पोहचले..असो...
काहींनी आज स्व आबासाहेबाच्या स्मृतीस्थळी जाऊन स्व.आबासाहेबांच्या विचाराच्याच विरोधात काही वक्तव्ये केली आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. आबासाहेब सुध्दा एकदा का निवडणुक झाली की पुंन्हा..एकदीलाने एकत्रीतपणे पक्ष भेद विसरुन काम करायचे....
हे यांना माहीत नसावे .. आज यांना आबासहेबांच्र्या विचाराबात फार चिंता वाटु लागली आहे..यांची ही चिंता विधानसभेला दिसली नाही तो भाग वेगळा ...
.कृपया आबासाहेबा प्रती फार सहानभुती आहे असे भासवत काहींनी आज नको ती वक्तव्ये केली आहेत त्यांचं
म्हणने आसे आहे की..सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रीत येऊन आसे कार्यक्रम घेणे हे चुकीचे आहे.आसे कसे तु़ंम्ही सगळे एकत्रीत येतात ?
तु़ंम्ही रोजच राजकारणाच्या माध्यमातुन भांडत बसावे ही यांची अपेक्षा आसावी.शेवटी प्रत्येकजण आपल्या वैचारीक विचारधारेच्या मर्यादेनुसार बोलत आसतो
म्हणा .त्यांना आसे वाटते की ... सगळ्या पक्षांनी एकत्रीत यायचेच नाही..रोज एकमेकांशी विरोधानेच वागायचे...सतत एकमेकांवर टिका करायची
..कुठल्याच कार्यक्रमात एकमत होऊन एकत्रीत यायचे नाही.हा विचार या बोलणाऱ्यांचा आहे.सतत विघ्न,धुस- फुस असली पाहीजे. हसत खेळत राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण काहींना नको आसते..
आरे भावांनो हे सारे एकत्रीत आले ते फक्त पालकमंत्री महोदयांच्या सत्कारामुळे.कशाला आपण उगीच वाईट वाटुन घ्यायचे..म्हणे तिघे एकत्रीत का आले ?
आरे भावांनो हा राजे छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज,महात्मा ज्योतीबा फुले विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ,राजमाता अहिल्यादेवी होळकर,
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,संत बसवेश्वर महाराज,आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ,श्री संत रोहीदास महाराज,संत गाडगे महाराज आशा अनेक राष्ट्र पुरुषांच्या विचारावरती वाटचाल करणारा महाराष्ट्र आहे..
तसेच स्व आबासाहेबांनी राजकारणा पलीकडचे संमंध जपले होते..स्व.आबासाहेबांनी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचे सत्कार केले तसेच आबासाहेबांचा सुध्दा सत्कार अनेक नेत्यांनी केल्याचे
मी स्वता: पाहीले आहे ...राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही चांगल्या गोष्टी होत असतील किंवा तसा प्रयत्न काही अंशी होत आसेल तर आपण सकारात्मकता दाखवायला हवी.
विरोधासाठी विरोध नसावा.सांगोला तालुक्याचा आदर्श इतरांनी सुध्दा घ्यावा आशा प्रकारची चर्चा राज्यभर आहे.मग कशाला उगीचच वाद- विवाद असावे अशी अपेक्षा ठेवताय. आहो रोजच्या रोज राजकारण करत बसायचे नसते
राजकारण म्हणजे समाजसेवेचे उत्तम माध्यम आहे.समाजसेवा करताना.. सांस्कृतीक कार्यक्रम करताना..सामाजीक कार्यक्रम करीत असताना...
वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभ करताना... उगीचच राजकारण आणायचे नसते ही आबासाहेबांची शिकवण आहे.सारखेच राजकारण ..राजकारण कशाला करत बसायचे...
पाकमंत्री साहेबांचा नागरी सत्कार समारंभ होता.तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत तालुक्याला भरीव मदत व्हावी एवढाच हेतु या सत्कार समारंभाचा होता..दुसरे तिसरे काही नाही...
शेवटी राजकारण करीत असताना आपल्या राज्यात काही चांगल्या प्रथा परंपरा आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहीजे. आशा कार्यक्रमाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतोय यावर बरचसं अवलंबुन असते...
जर का आपण संकुचीत विचार धारेतुन विचार करणे सोडले तर सारे काही समजेल...व उमजेल ही आसे मत शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले...
0 Comments