google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक तीन मुलांकडून काकाला मारहाण; आवाज ऐकून आलेल्या मुलाला दगडाने मारहाण करत हत्या;

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक तीन मुलांकडून काकाला मारहाण; आवाज ऐकून आलेल्या मुलाला दगडाने मारहाण करत हत्या;

सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक तीन मुलांकडून काकाला मारहाण;


आवाज ऐकून आलेल्या मुलाला दगडाने मारहाण करत हत्या; 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर:- शेतात रात्रीच्या वेळी बसलेला तीन अल्पवयीन मुलांना हटकल्याने एकाला मारहाण करण्यात आली. 

काकाला मारहाण होत असल्याचा आवाज ऐकून धावत आलेल्या मुलाला देखील दगड फेकून मारला.

यात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या वैराग जवळील सर्जापूर येथे घडली आहे. या घटनेत मारहाण करणाऱ्या तिन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वैराग्य जवळील सर्जापूर येथे रात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. 

या घटनेत इमरान अमर पाटील (वय १४) असं मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.

दरम्यान इमरान पाटील याचा काका शाहीर पाटील हे रात्री शेतात गेले असता त्या ठिकाणी तिघे अल्पवयीन मुले बसली होती.

 त्यांना पाहून येथे का बसलात असे विचारले असता तीन अल्पवयीन मुलांनी काकाला काठी आणि दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली होती.

मुलाला दगडाने मारहाण

काकाला मारहाण होत असताना आवाज ऐकून इमरान हा तिथे आला. तेथे त्यांनी मुलांना हटकण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिघापैकी एकाने इमरान याला देखील दगड फेकून मारला. 

यामुळे रक्तबांबळ अवस्थेत इमरान हा रस्त्यावर पडला. यानंतर त्याला उपचारासाठी बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात

दरम्यान घडल्या प्रकरणानंतर इमरानचे वडील अमर पाटील यांनी वैराग पोलीस ठाण्यात जात घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. त्यांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधात फिर्याद दाखल करत

 पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तीनही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments