सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्कार समारंभास शिवसैनिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे मा. आम. शहाजीबापू पाटील यांचे आवाहन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सांगोला शहर व तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
आज गुरुवार दिनांक 3 रोजी सायं. 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी शहर व तालुक्यातील तमाम शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
0 Comments