न्यायप्रक्रियेतील वकील हा प्रमुख घटक- आ. बाबासाहेब देशमुख अँड. विशालदीप बाबर यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): लोकशाहीत न्यायव्यवस्थेला अनन्यसाधारण असे गहत्य असून १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारत देशात न्याय प्रक्रियेत वकील हा घटक प्रमुख आहे.
दैनंदिन जीवन जगत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवताना
त्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी वकिलाची गरज असते. सांगोला नगरीतील अनेक वकिलांनी आपले नाव महाराष्ट्रात उज्वल केले असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
अॅड. विशालदीप बाबर यांनी नवीन कोर्ट इमारती शेजारी नव्यानेच सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पंढरपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ तुकाराम साळुंखे, प्रा. नानासाहेब लिगाडे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील,
शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस दादाशेठ बाबर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि. रमेश जाधव, सांगोला विधी संघाचे अध्यक्ष आर. पी. चरहाग आदी मंडळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, माजी उपसभापती संतोष देवकते, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उदयबार घोंगडे, संरक्षण अधिकारी सौ. शिवनेरी केदार मॅडम यांनी विशालदीप बाबर यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सर्व वकील मंडळी, अरविंद केदार, संजयनाना इंशवले, गिरीश गंगवडे, संगम धांडोरे, एम.डी. कोळसे, डी.डी. कोळसे, प्रा. किसन माने, प्रा.चंद्रकांत इंगळे, तानाजी बाबर गुरुजी,
मानती उत्तळे, माणिक गुरव, उतळे सर, यांच्यासह सोनंद व डोंगरगाव येथील नगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक अॅड. विशालदीप बाबर यांनी तर आभार अॅड. नितीन गव्हाणे यांनी मानले.
0 Comments