google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा तालुक्यात..शिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Breaking News

मंगळवेढा तालुक्यात..शिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात..शिक्षकी पेशाला काळीमा!


अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

मंगळवेढा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. बोराळे शाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन (१७ वर्षीय) विद्यार्थीनीला घरी बोलावून घेवुन

 घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून अंगावरून हात फिरवून  तिच्याशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रमेश नागनाथ पाटील सर (वय ५६ रा. बोराळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन विद्यार्थीनीला इयत्ता पाचवी ते सातवी पर्यत रमेश नागनाथ पाटील सर हे हिंदी व मराठी या विषयाला शिक्षक होते.

अल्पवयीन विद्यार्थी इयत्ता पाचवी व सहावी या वर्गात शिकत असताना हिंदी व मराठीच्या तासाचे येळी आर.एन. पाटील सर हे नेहमी फिर्यादी जवळ येवून फिर्यादीच्या अंगाला हाताने स्पर्श करुन बोलत असायचे.

परंतु फिर्यादीला याबाबत काही समजत नसल्याने याबाबत घरात कोणाला काही सांगितले नव्हते. त्यानंतर इयत्ता सातवी व इयत्ता आठवी या वर्गावर त्यांचा कोणताही तास नसताना ते फिर्यादीशी बोलण्याचा व जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे.

 त्यानंतर फिर्यादी इयत्ता नववीमध्ये असताना आर. एन. पाटील सर हे वर्गावर कोणत्याही विशयाला शिकवत नव्हते. तरीही ते ऑफ तासाचे वेळी येवून फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे.

फिर्यादीला माझ्या घरी ये, आमच्या घरी कोण नसते, आपणाला बोलता येईल, असे बोलायचे तसेच फिर्यादीच्या वॉटसअपद्वावारे वारंवार मेसेज करून फिर्यादी अल्पवयीन मुलीचे फोटो पाठविण्यास सांगायचे.

फिर्यादीला फोन करून तु माझे घरी ये, घरी आलीस तर तुला मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील 

व तुझा बोर्डात नंबर येईल तुझे नाव होईल. असे म्हणुन त्यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीकडे दोन वेळा शरिरसंबंधाची मागणी केली होती.

दि.17 मार्च 2025 रोजी फिर्यादीचा शेवटचा भुगोलचा पेपर दुपारी 2 वाजता संपला पेपर संपल्यावर फिर्यादीच्या वडिलांचे फोनवर आर. एन. पाटील सर यांनी फोन करून पेपर कसा गेला

 असे विचारुन त्यांनी घरी तु कधी येते अस विचारले असता फिर्यादीने घरी येण्यास नकार देवून फोन कट केला.

 त्यानंतरही आरोपी पाटील सर वारंवार फोन करुन घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरमध्ये नापास करीन, तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत अशी धमकी देत होते.

आरोपी शिक्षक पाटील यांच्या धमकीला फिर्यादी घाबरुन सरांचया घरी सायं 4 च्या सुमारास गेली त्यावेळी  आरोपी आर. एन. पाटील सर एकटेच घरी होते. 

त्यानंतर आ. एन. पाटील सरांनी त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद केला व फिर्यादीला जवळ ओढून अंगावरून हात फिरवून चुंबन घेवू लागले.

तेव्हा फिर्यादी मोठमोक्याने ओरडू लागल्याने त्यांनी सोडले. त्यानंतर आरोपी पाटील यांचा नंबर ब्लॉक केला होता. तरीही त्यांनी फिर्यादीला दि.16 एप्रिल 2025 रोजी साधा मेसेज करून त्रास देत असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments