google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोलामार्गे जाणाऱ्या रत्नागिरी - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ; वाहनधारकातून संताप लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Breaking News

सांगोलामार्गे जाणाऱ्या रत्नागिरी - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ; वाहनधारकातून संताप लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

सांगोलामार्गे जाणाऱ्या रत्नागिरी  - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ; वाहनधारकातून संताप लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला मार्गे जाणाऱ्या रत्नागिरी  - सोलापूर एन एच 965 राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने या टोल रोडची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. 

महामार्गाची ॲम्बुलन्स वेळेत पोहोचत नसल्याच्या ही तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधक जीर्ण झाले आहेत. विद्युत लाईट दिवे पूर्णपणे बंद झाले आहेत

. महामार्गावर व बायपास वर केरकचरा पडला आहे. यामुळे टोल भरूनही वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान लाखो रुपयांची टोल वसुली केली जाते,

 मात्र देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासाबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला काही घेणे – देणे राहिलेले नाही याबाबत वाहनधारकातून अनेक तक्रारी उपस्थित केल्या जात आहेत. 

रत्नागिरी - सोलापूर  या  महामार्गाचे रुंदीकरण झाले. या महामार्गावर सांगोला शहरातील बायपास म्हणजेच पंढरपूर रोड, चिंचोली रोड,

 महूद रोड, एकतपुर रोड, जुना मिरज रोड या बायपास ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रुंदीकरणानंतर रस्ता मोठा झाला, 

वाहनांचा वेग वाढला. टोल वसुली जोमाने सुरू झाली. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. महामार्गाची दुरवस्था, विद्युत लाईट , स्वच्छता, अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास 

त्याची गांभीर्याने व तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. महामार्गाच्या मुख्य लेन आणि सेवा रस्त्यावर सतत लहान, मोठे खड्डे पडलेले दिसून येतात.अशा गंभीर प्रकारामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. 

अपघातानंतर महामार्गाचे वाहन व पोलीस वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. याबाबत वरिष्ठ विभाग याकडे गांभीर्याने घेत नसल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे. 

   नादुरुस्त वाहनांसाठी तत्काळ सुविधा मिळत नसल्याने ती वाहने तासनतास महामार्गावर उभी असतात. 

अशा वाहनांना धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात कोणी काही बोलत नसल्याने या संबंधित प्रशासनाचा अधिकारी वर्ग, टोल विभाग सुस्त झाला आहे.

वारंवार भीषण अपघातात जखमी होतात, अपंगत्व येते, जीव गमवावा लागतो. पोलिस पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. 

मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. 

अशा ही तक्रारी वाढत आहेत. यासह अनेक ठिकाणी महामार्गाचे शौचालयास कुलूप असल्याचे वाहनधारकांमधून तक्रारी प्राप्त होत आहेत. तर अनेक ठिकाणी शौचालय मध्ये पाणी नाही 

साफसफाईचा अभाव अशा एक ना अनेक तक्रारी होत असताना संबंधित टोल प्रशासन फक्त पैसे वसूल करण्याचे काम करीत आहे. सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये सदर प्रशासनाला अपयश आली आहे.

 यामुळे वाहनधारक त्रस्त असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर निर्बंध घालावेत महामार्गाची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments