मोठी बातमी..सांगोला शहरात धुळीच्या प्रदुषणाने वाढले सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात भुयारी गटारींची कामे सुरू असून शहरात सर्वत्र धुळीचे लोट पहावयास मिळत आहेत. बदलत्या हवामानामुळे तसेच शहरातील
धुळीच्या प्रदूषणामुळे सर्दी, तापाच्या, खोकला घसा खवखवणे, फुफ्फुसांचे आजार रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात १२५ कोटींच्या निधीतून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.
शहरातील बहुतांश खड्डे खोदण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे शहरातील सर्व रस्ते धुळीने माखले आहेत.
नागरिकांना तर घराच्या दरवाजे, खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची खोदाई झाल्यानंतर नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाणी मारण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र, भुयारी गटारीसाठी खोदलेल्या रस्त्यावर पाणी मारण्याकडे ठेकेदाराने
दुर्लक्ष केल्याने शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. गटारीचे पाईप टाकल्यानंतर खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले आहे.
श्वसनातून किती प्रमाणात धूळ जाऊ शकते, याचा अंदाज केल्यास दुचाकीस्वारांबरोबर नागरिकांवर नको तो रस्ता अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात धुळीचे साम्राज्य पसरले
असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
0 Comments