google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागरिकांनो सावधान! सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यावर आजपासून 'इतके' रुपये जादा टोल आकारला जाणार

Breaking News

नागरिकांनो सावधान! सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यावर आजपासून 'इतके' रुपये जादा टोल आकारला जाणार

नागरिकांनो सावधान! सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यावर आजपासून 'इतके' रुपये जादा टोल आकारला जाणार


सोलापूर जिल्ह्यात आजपासून टोलच्या दरात ५ रुपयांची वाढ होणार असून, चारचाकी वाहनाला कमीत कमी ६५ रुपये तर जास्तीत जास्त ८५ रुपये टोल आकारला जाणार आहे.

चारचाकी वाहनाला विजयपूर महामार्गावर सर्वाधिक म्हणजे ८५ रुपये टोल आकारणी होणार आहे.

पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रक तसेच बसेसना २६० रुपये टोल लागणार आहे. तर, विजयपूर हायवेवर २८० रुपये टोल लागणार आहे.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १ एप्रिलपासून नवीन टोल दर जाहीर केले आहे. नवीन दरानुसार टोल आकारणी करावी, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

अक्कलकोट हायवेवर पूर्वी ६० रुपये टोल लागायचा. मंगळवार, १ एप्रिलपासून ६५ रुपये टोल लागणार आहे. २४ तासांकरिता ११५ रुपये लागणार आहे. पुणे हायवेवर चारचाकी वाहनांना पूर्वी ७० रुपये होता.

मंगळवारपासून यात ५ रुपयांची वाढ होणार आहे. तुळजापूर महामार्गावर चारचाकी वाहनांना पूर्वी ७० रुपये टोल लागायचा. आता ७५ रुपये लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण सहा टोलनाके

जिल्ह्यातील ६ टोलनाक्यांवर वर्षाकाठी ३९० कोटी १२ लाखांची टोलवसुली केली जाते. रोज सरासरी दीड लाखाहून अधिक वाहने या टोलनाक्यांवरून धावतात. पुणे हायवेवरील सावळेश्वर तसेच वरवडे या दोन टोलनाक्यावर वर्षाकाठी २१५ कोटींची टोल आकारणी केली जाते.

सर्वांत कमी टोल सोलापूर-सांगली महामार्गावरील इंचगाव टोलनाक्यावर वार्षिक ३० कोटी रुपये टोल जमा होतो. अक्कलकोट हायवेवरील वळसंग ३१.२ कोटी रुपये, सोलापूर सांगली महामार्गावरील अनकढाळ वार्षिक ३७ कोटी ८ लाख रुपये टोल जमा होतो.

Post a Comment

0 Comments