खळबळजनक..सांगोला तालुक्यातील बलवडी येथे शॉर्टसकीट
होवून डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकर्याचे मोठे नुकसान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी):-इलेक्ट्रीक तारेचे शॉर्टसकीट होवून ठिणगी पडून सांगोला तालुक्यातील बलवडी येथील धनाजी पवार या शेतकर्यांची डाळिंब बाग जळून खाक झाली असल्याची घटना शुक्रवार दि.28 मार्च रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिगाडेवाडी येथील श्री धनाजी रामकृष्ण पवार यांची 1 हेक्टर डाळिंबाची बाग आहे.
इलेक्ट्रीक तारेचे शॉर्ट सर्कीट होऊन ठिणगी पडून पेट घेतल्याने 1 हेक्टरवरील डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी डाळिंब झाडाचे, पाने, फुले, फळे, खोड याचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच या जळीतामध्ये ठिंबक सिंचन, पी.व्ही.सी.पाईप, एस.टी.पी.सेट, तसेच डाळिंबाचे फळाचे मोठे नुकसान झाले आहे.
चालू उन्हाळ्यामधील दुष्काळ पाहता बागेची बाग जगताना टँकरने पाणी घालून जीवाचं रान करून पिकावरील बाग जगवत असताना
शेतकर्यांच्या नाकी नऊ आले असताना हातात तोंडाला आलेले डाळिंबीची 1000 झाडे जळून खाक झाली आहे.
डाळिंबाची बाग जळून खाक झाल्यामुळे न भरून येणारे नुकसान झालेलं आहे. तरी शासकीय नियमाप्रमाणे मला भरपाई मिळावी, अशी विनंती शेतकरी धनाजी पवार यांनी केली आहे.
डाळिंब बाग जोपासण्यासाठी पवार कुटुंबियांनी खूप मेहनत घेतली होती. उन्हातान्हात तर कष्टच केले शिवाय झाडांना फळधारणा व्हावी,
म्हणून रासायनिक खते व औषधांसाठी उसनवारी करुन मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments