google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...हातपाय तोडले, मुंडकं छाटलं, पुण्यात नदीपात्रात आढळला खांडोळी केलेला मृतदेह

Breaking News

खळबळजनक...हातपाय तोडले, मुंडकं छाटलं, पुण्यात नदीपात्रात आढळला खांडोळी केलेला मृतदेह

खळबळजनक...हातपाय तोडले, मुंडकं छाटलं, पुण्यात नदीपात्रात आढळला खांडोळी केलेला मृतदेह

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दानेवाडी गावच्या घोडनदीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. 

अत्यंत अमानुषपणे ही हत्या करून अज्ञातांनी हा मृतदेह याठिकाणी टाकल्याचं समोर आलं आहे.

मृतदेहाचे हात पाय तोडून, मुंडकं छाटून अक्षरश: खांडोळी केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. 

हा मृतदेह सापडल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या शिरूर घोडनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 9 मार्च 2025 रोजी माऊली सतीश गव्हाणे नावाच्या 19 वर्षीय तरुणाची हरवल्याची नोंद झाली होती.

 हा तरुण शिरूर तालुक्याच्या जवळील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील 

दानेवाडी गावचा रहिवासी असून तो शिरूर येथील सीटी बोरा महविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. सध्या त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होती. 

9 मार्चला तो अचानक बेपत्ता झाला. या प्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, बुधवारी १२ मार्चला दानेवाडी गावच्या घोडनदी पात्रातील एका विहिरीत एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पोत्यात भरून टाकलेलं आढळून आलं आहे. 

त्या पुरुष जातीच्या प्रेताचे दोन्ही हात, दोन्ही पाय, मुंडके छाटलेले आहे. पूर्ण खांडोळी केलेले 

प्रेत आढळल्याने सर्वत्र संतापाची लाट असून हा मृतदेह ९ तारखेला बेपत्ता झालेल्या माऊलाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मिसिंग तरुणाच्या घरच्यांसह शेकडो नातेवाईकांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठलं. कदाचित हे प्रेत आपल्याच मुलाचे आहे 

की काय ? अशी शंका या सर्वांना असून, त्याचे मुंडके प्रेतासोबत नसल्याने ते प्रेत माऊलीचेच आहे की नाही? 

याची खात्री कुणालाच पटत नाहीये. पण माऊलीच्या वर्णनासारखाच हा मृतदेह असल्याचं अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे गावात तणाव वाढला आहे.

 या अनोळखी प्रेताच्या चौकशीसाठी अहिल्यानगर व पुणे ग्रामीण पोलिसांची पथके तपासाला लागलेली असल्याचे, 

शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments