google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार प्रसाद लाड यांनी सांगोला येथील निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या मुद्याबाबत विधानपरिषद मध्ये उपस्थित केला तारांकित प्रश्न : नितीनभाऊ रणदिवे

Breaking News

आमदार प्रसाद लाड यांनी सांगोला येथील निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या मुद्याबाबत विधानपरिषद मध्ये उपस्थित केला तारांकित प्रश्न : नितीनभाऊ रणदिवे

आमदार प्रसाद लाड यांनी सांगोला येथील निकृष्ट शालेय पोषण


आहाराच्या मुद्याबाबत विधानपरिषद मध्ये उपस्थित केला तारांकित प्रश्न : नितीनभाऊ रणदिवे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी :कमलापूर ता. सांगोला येथील निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या विषय आम्ही २४ जाने. २५ रोजी पर्दाफाश करून शासन दरबारी पाठपुरावा केला होता

 तथापि आमच्या मागणीची दखल घेऊन आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न क्रमांक - १४४१ सांगोला तालुक्यातील (जि. सोलापूर) शालेय पोषण आहार ठेवण्यात 

येणाऱ्या गोडाऊन मध्ये उंदरांच्या लेंड्या आढळून आल्याबाबत दिनांक २५ जानेवारी रोजी विधान परिषदेमध्ये मुद्दाउपस्थित केला असून ते पुढील प्रमाणे

 १) सांगोला तालुक्यातील (जि. सोलापूर) शाळांमध्ये पुरवठा केला जाणारा शालेय पोषण आहार ठेवण्याच्या गोडाऊन मध्ये उंदराच्या व घुशीच्या लेंड्या आढळून आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी माहे जानेवारी, २०२५ मध्ये निदर्शनास आणून दिले आहे, हे खरे आहे काय ?

२) असल्यास, सदर पोषण आहार सांगोला तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचविला जात असून गोडाऊन मध्ये ठेवल्या जाणाऱ्या पोषण आहाराकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विषबाधा होऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे ही खरे आहे काय.?

३) असल्यास, शालेय पोषण आहाराचे सनियंत्रण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे..

४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वरील प्रश्नाचे उत्तर पूरक टिप्पणीसह आजच कोणत्याही परिस्थितीत शासनास पाठविण्यात यावे अशी मागणी आमदार लाड यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे.

सदर मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार तसेच तालुक्याभरामध्ये शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराबद्दल संबंधित ठेकेदारांनी दर्जेदार आहार द्यावा

 व सदर ठिकाणी निकृष्ट आहार देणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी यावेळी दिली.

चौकट 

कमलापूर ता. सांगोला येथील निकृष्ट शालेय पोषण आहाराचा मुद्दा जनतेसमोर आणला असून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शालेय पोषण

 आहाराच्या दर्जा तपासण्यात यावा अशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे करणार

नितीनभाऊ रणदिवे. संस्थापक अध्यक्ष लहुजी पँथर सेना.

Post a Comment

0 Comments