सांगोला नगरपरिषदेचा थकीत व चालू वर्षाचा कर भरणा विहित वेळेत करावा :
डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी यांचे नागरिकांना आवाहन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी: सांगोला नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता धारकांची घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे, आणि खुली जागा भाडे वसुलीची मोहीम डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सद्यस्थितीत सांगोला शहरामध्ये *भुयारी गटार योजना
या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू आहे. सदर कामामुळे शहरात धुळीचा त्रास वाढला आहे, याची जाणीव नगरपरिषद प्रशासनास आहे. सदर प्रकल्प लवकरच पूर्ण करून शहरात नवीन रस्ते तयार करण्यात येतील.
यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यास उघड्यावरील सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होणार असून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होणार आहे.
सांगोला शहरातील नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे, खुली जागा भाडे याची थकीत व चालू वर्षाची कर वसुली होणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा त्वरित नगरपरिषद कार्यालयात करावा अन्यथा नगरपालिका प्रशासनास नाईलाजास्तव नळ कनेक्शन कट करणे,
थकीत मालमत्ता धारकांची यादी वर्तमानपत्रात तसेच चौकात बोर्ड लावून प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच नगरपरिषद मालकीचे गाळे सील करून ताब्यात घेण्यात येतील. अशा प्रकारची कटू कार्यवाही टाळायची असेल
तर शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत व चालू रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी केले आहे.
0 Comments