खळबळजनक घटना..सांगोला येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला येथे ट्रॅक्टरमधून खाली रोडवर पडल्याने ट्रॅक्टर ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने शेतमजूर तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास
बागलवाडी-अजनाळे रोडवरील मठ वस्तीनजीक घडली. अनिल किसन भंडगे असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पसार झाला आहे. अजनाळे येथील
चालक शिवम देशमुख हा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली घेऊन महीम येथील शेतकऱ्यांकडे शेणखत भरण्यासाठी गेला होता.
दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये खत भरल्यानंतर तोच ट्रॅक्टर पुन्हा महीम येथून बागलवाडी मार्गे अजनाळेकडे निघाला असता वाटेत बागलवाडी – अजनाळे
रोडवरील मठ वस्तीनजीक ट्रॅक्टरमध्ये बसलेला अनिल भंडगे अचानक रोडवर खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने
तो जखमी झाल्याने अनिल भंडगे यास उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार बिपीन ढेरे करीत आहेत.
0 Comments