निवडणुका येतील जातील, परंतु आधी गावाचा विकास महत्त्वाचा आहे- राजश्रीताई नागणे पाटील.
१० लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राजश्रीताई नागणे पाटील यांच्या हस्ते संपन्न.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- गावचा विकास कुठल्याही परिस्थितीत थंबयाला नको ही आमची ठाम भूमिका आहे. गावच्या विकासाला चालना देण्यासाठी कडलास गावानंतर आता
शिरभावी गावामध्ये दहा लाख रुपयांची विकास कामे सुरू होत आहेत यामुळे निश्चितपणे गावच्या वैभवात भर पडेल आणि येथील नागरिकांना याचा फायदा होईल.
शिरभावी येथे बंडू पवार वस्ती दत्त मंदिर सभामंडप व सिद्धनाथ मंदिर पेव्हिंग बॉल्क बसविणे, या एकूण १० लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक २८ मार्च २०२५ रोजी राजश्रीताई नागणे पाटील यांच्या हस्ते हस्ते संपन्न झाला.
दरम्यान तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या शिफारशीनुसार २५ / १५ निधीतून सांगोला तालुक्याला भरघोस निधी मिळाला आहे.
यामध्येच कडलास नंतर आता शिरभावी येथे विकास कामाला सुरुवात झाली असून यापुढेही तालुक्यातील इतर गावांनाही निधी मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा राहील असे मत राजश्रीताई नागणे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरभावी गावचे सरपंच बाळासाहेब बंडगर, समाधान आप्पा सलगर, जेष्ठ नेते शिवाजीराव आण्णा गायकवाड, माजी नगराध्यक्ष मा. नवनाथभाऊ पवार, एन. वाय. भोसले सर, श्रीकांत इंगोले पाटील,
धायटी गावचे सरपंच रवी मेटकरी, आबासाहेब बंडगर, बाजीराव सलगर, धैर्यशील भैय्या नलवडे, आनंददादा होवाळ, अनिल दादा शेंडगे, विक्रम दादा होवाळ, पांडुरंग ताठे देशमुख, राजकुमार ताठे, अमोल भातुंगडे, सिकंदर पवार, आण्णासो मेटकरी,
रोहन जगदाळे, जगदीश होवाळ, देवीदास सलगर, सत्यवान सलगर, बापू मस्के, नवनाथ शेंडगे, नवनाथ मोरे, काकासो चोरमले, बबन मोरे, पोपट रणदिवे, अशोक सलगर, सुरेश साळुंखे, किरण पालकर,
दिनेश रणदिवे, संदिप जगदाळे, प्रमोद ढोले, अनिल भाऊ ढोले, नवनाथ अर्जुन, गौरीहार सरवळे, दादासो पवार, मंताबापू पवार, आप्पासाहेब माने, दत्तात्रय अर्जुन साहेब, वसंत माने, समीर मुलाणी,
इंद्रजित मदने, सचिन मोरे, तात्यासो चंदनशिवे, जितेंद्र लेंडवे, शशिकांत हिलाळ, संतोष सलगर, विक्रांत नलवडे, शिवदास शिनगारे, नवनाथ बंडगर, नागनाथ शेंडगे आदी उपस्थित होते.
0 Comments