ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात ५ आणि ६ एप्रिलला महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला महाविद्यालयामध्ये एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सिंचन परिषद पाच व सहा एप्रिल रोजी होणार
असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दि. मा. मोरे आणि परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबूराव गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र सिंचन सहयोग ही छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय संस्था आहे. या संस्थेच्यावतीने पाणी आणि सिंचन या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते.
या संस्थेने यापूर्वी राज्यातील ग्रामीण भागात वीस पाणी परिषदा घेऊन हजारो तज्ज्ञ मार्गदर्शकांना व जलचिंतकांना एका मंचावर आणले. त्याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला.
एकविसावी महाराष्ट्र सिंचन परिषेद सांगोल्यामध्ये होत आहे. हवामानातील दोलाईमानता आणि सिंचन व्यवस्थापन हा या परिषदेचा मुख्य विषय आहे. त्याचबरोबर आधुनिक सिंचन प्रणाली, सिंचनाच्या भावी दिशा,
सिंचित शेतीतील प्रयोग, फळबाग शेती या विषयावर मार्गदर्शन व प्रयोगशील शेतकन्यांचे अनुभव या परिषदेमध्ये शेतकऱ्यांना ऐकायला मिळणार आहेत. या राज्यस्तरीय सिंचन परिषदेच्या आयोजनाबाबतची बैठक
येथील सांगोला महाविद्यालयामध्ये पार पडली. यावेळी डॉ. दि. मा. मोरे, परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्र झपके, महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे कार्यकारिणी सदस्य सुधाकर चौधरी,
समन्वयक प्रशांत आडे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, वसुंधरा विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शेलार, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी,
सांगोला तालुका उम्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, सचिव अॅड. उदय घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, माजी सचिव म. सि. झिरपे, सुरेश फुले, प्राचार्य डॉ. सुरेश भोसले आदी उपस्थित होते.
0 Comments