google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला चिंचोली रोड, येथे अज्ञात कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

खळबळजनक..सांगोला चिंचोली रोड, येथे अज्ञात कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खळबळजनक..सांगोला चिंचोली रोड, येथे अज्ञात कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- अज्ञात कारणाने तरुणाने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना शुक्रवार रोजी घडली आहे. गणेश अशोक चिवटे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

 गणेश चिवटे यांनी चिंचोली रोड, सांगोला येथील आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणामुळे गळफास घेतला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला औषध उपचाराकरिता सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. 

डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. सांगोला पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments