google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ब्रेकिंग ! माळशिरस तालुक्यातील ‘ती’ हत्या प्रेम प्रकरणातून प्रेयसीच बनली व्हिलन, रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

Breaking News

सोलापूर ब्रेकिंग ! माळशिरस तालुक्यातील ‘ती’ हत्या प्रेम प्रकरणातून प्रेयसीच बनली व्हिलन, रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

सोलापूर ब्रेकिंग ! माळशिरस तालुक्यातील ‘ती’ हत्या प्रेम प्रकरणातून


प्रेयसीच बनली व्हिलन, रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय 

निघृणपणे खून करून पिलीव-चांदापुरी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला होता.

आकाशच्या शरीरावर चटके देण्यात आले होते. तोंडातसुद्धा सळईचे चटके दिले होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीच्या मदतीनेच आकाशला 

बोलावून नवरा व इतर नातेवाईकांच्या मदतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली व वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला.

पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. यामध्ये प्रेयसीने केलेल्या फोनवरून बराच उलगडा झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा व प्रेयसी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेयसीचा नवरा फरारी होता.

 मात्र, बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला ताब्यात घेतले. 

प्रेयसीनेच आपला प्रियकर आकाश याला बोलावून घेऊन नातेवाईकांच्या मदतीने आकाशचा अमानुषपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 यामधील प्रेयसीचे लग्न झालेले आहे. तिचा पती परदेशात नोकरीला आहे. तसेच आकाशचेही लग्न झाले असून, त्याला दोन महिन्यांचा मुलगा आहे.

सोमवारी रात्री उशिरा आकाशला आलेल्या फोनमुळे या हत्येला वाचा फुटली. 

चांदापुरी येथील एका महिलेचे व आकाशचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याचे येणे-जाणे, फोनवरून बोलणे, सोशल मीडियावरून बोलणे सुरू होते. 

त्यामुळे एवढ्या रात्री आपल्या प्रेयसीचा फोन आला म्हटल्यावर आकाश हा आपल्या आई व पत्नीला मी दहा मिनिटांत परत येतो,

 असे म्हणून गेला. तो लवकर परत येईना म्हटल्यावर आईने रात्री खूप उशिरा फोन केला, पण तो फोन उचलतच नव्हता.

Post a Comment

0 Comments