खळबळजनक...160 रुपये किलो, होळीच्या दिवशी विठुरायाच्या पंढरपुरात बंद घरामध्ये सुरू होता प्रकार, गावात खळबळ
पंढरपूर : महाराष्ट्रामध्ये एकीकडे मल्हार झटका सर्टिफिकेटवरून वाद पेटला आहे. तर दुसरीकडे पंढरपूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी सांगोला आणि मोहोळ येथून पंढरपुरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी
आणलेले सुमारे ३३ हजार २८० रूपये किंमतीचे २०८ किलो गोवंश मांस शहर पोलिसांनी जप्त केलं आहे.याप्रकरणी दोघांविरूद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1९७६ च्या कलमान्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू दत्तात्रय वायदंडे (वय ३५) आणि सोहेल अस्लम कुरेशी (वय २३) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहे.
धुलवड दिवशी मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असते. हे ओळखून यातील खंडू वायदंडे याने सांगोला येथून तर सोहेल कुरेशी याने मोहोळ येथून विना परवाना गोवंश मांस विक्रीसाठी आणलं होतं.
शहरातील अण्णाभाऊ साठेनगर इथं दोन वेगवेगळ्या पत्राशेडमध्ये बेकायदेशीररित्या हे मांस विक्री केले जात होतं. याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वज़ीत घोडके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला.
160 रुपये किलो दराने विक्री
पोलीस पथकाने वायदंडे आणि कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन गोवंश मांस विक्रीविषयी चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. 1६० रूपये किलो दराने हे मांस विक्री करीत असल्याचे समोर आलं.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉ.समाधान माने यांनी दाखल केली आहे. पुढील तपास हवालदार पवार हे करीत आहेत. दरम्यान, तीर्थक्षेत्र पंढरपुरात अशा प्रकारचा प्रकार समोर आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
0 Comments