google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..घेरडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीला यश; म्हैशाळचे पाणी घेरडी परिसरात पोहचले

Breaking News

मोठी बातमी..घेरडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीला यश; म्हैशाळचे पाणी घेरडी परिसरात पोहचले

मोठी बातमी..घेरडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीला यश; म्हैशाळचे पाणी घेरडी परिसरात पोहचले 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, म्हैशाळचे अधिकारी यांचे घेरडी शेतकरी यांच्याकडून विशेष आभार

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी ता सांगोला येथील शेतकऱ्यांनी म्हैशाळच्या पाण्यासाठी कार्यकरी अभियंता यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. डी डी सुद्धा बँकेत काढले होते परंतु दोन महिने त्याची दखल घेतली नव्हती.

परंतु घेरडी येथी शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते बयाजी लवटे व शेतकरी यांनी सांगोला तालुक्याची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच म्हैशाळचे अधिकारी यांना निवेदन दिले होते.

त्यानंतर आमदार. बाबासाहेब देशमुख यांनी फोन वरून या संदर्भात संवाद साधला होता त्यांना म्हैशाळच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाणी सोडू

 असे सांगितले होते. त्याच बरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विशेष लक्ष घालून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले.

घेरडी शेतकरी आक्रमक झाले होते. दोन दिवसात पाणी नाही आले तर दि. 17मार्च रोजी पाणी मिळेपर्यंत अंदोलनास बसू असा इशाला निवेदनातुन दिला. 

होता परंतु खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सांगण्यावरून म्हैशाळचे अधिकारी यांनी आज घेरडी परिसरात पाणी सोडले.

त्या बद्दल घेरडी शेतकरी व युवक नेते बयाजी लवटे यांच्या कडून खासदार धर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख व म्हैशाळचे अधिकारी यांचे विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments