जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली निधीची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मुंबई येथे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांची
आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी विधानभवनात भेट घेत सांगोला तालुक्यातील माण नदीवरील पुरामुळे नुकसान झालेल्या
११ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी तसेच बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.
सांगोला तालुक्यातील माण नदीवरील पुरामुळे नुकसान झालेल्या ११ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे
यांच्याकडून शासनास प्राप्त झालेला आहे. मात्र त्यास मंजुरी न मिळाल्याने दुष्काळी तालुक्यातील बंधाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही.
त्यासाठी सांगोला तालुक्यातील माण नदीवरील पुरामुळे नुकसान झालेल्या ११ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्तावास तात्काळ मान्यता देऊन बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी
यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावेळी जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
0 Comments