धक्कादायक ..सांगोला शहरात भीषण अपघात; दोन ठार नऊ जखमी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला – डाळिंब वाहतूक करणारी पिकअप जीप व ४०७ टेम्पोची समोरासमोर जोराची धडक होवून भीषण अपघातात २ ऊसतोडणी कामगारांचा मुत्यू झाला तर ९ महिला व पुरुष ऊस तोडणी कामगार जखमी झाले
असून जख्मीना उपचारासाठी सांगोल्यातील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात काल बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास सांगोला- मिरज रोडवरील गायत्री मॉल समोर घडला बाबुराव महादेव गोडसे-४२
व एकनाथ सोपान गडदे-५३ दोघेही रा गौडवाडी ता सांगोला अशी मृतांची नावे आहेत तर सुजाता बापू आलदर-३५, रेश्मा संजय ऐवळे-३०, विमल भारत कांबळे -५५,दामू राजाराम शिंगाडे- ६०,
मैनुहुद्दीन गुलाब मुलानी-७०, गोरख लिंगू सरगर- हर्षद हनुमंत काटे-१८ हनुमंत श्रीरंग काटे- ७०,भारत विष्णू कांबळे- ६५,गणपत दत्तू आलदर-५० सर्वजण रा. गौडवाडी ता. सांगोला अशी जखमींची नावे आहेत .
दरम्यान अपघातानंतर टेम्पो फरपटत जावून उजव्या बाजूला पलटी झाला त्यामुळे टेम्पोतील उसाच्या वाड्याखाली ११ ऊसतोडणी कामगार अडकले होते.
स्थानिक नागरिकांनी टेम्पो उचलून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचार करता रुग्णालयात पाठवून दिले. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.
सांगोला पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पिकअप मधील डाळिंबाचा रस्त्यावर खच पडला होता तर पिकअप व टेम्पो दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
गौडवाडी ता सांगोला येथील ५ महिला व १२ पुरुष ऊस तोडणी कामगारांनी कडलास ता सांगोला शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करून बुधवारी रात्री ९ च्या
सुमारास एम एच -१०-के -६७ ५३ या ४०७ टेम्पो मधून सांगोल्याकडून मिरज रोडने गौडवाडी घराकडे निघाले होते तर एखतपुर येथून एम एच -४५ -एएफ-६७८५ या पिकअपमध्ये डाळिंब भरून मिरज रोडने
सांगोला येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी निघाला होता वाटेत दोन्ही वाहनांची मिरज रोडवरील गायत्री मॉल समोर समोरासमोर जोराची धडक होऊन हा भीषण अपघात घडला.
0 Comments