शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला व अफवांना बळी पडू नये.
शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांच्या विश्वासास पात्र असणारा पक्ष आहे.पुरोगामी विचारावर चालणारा पक्ष आहे.विधानसभा निवडणूक होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. तुमच्या मनातील
तरुण तडफदार दबंग आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजयी केले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात सत्ता नसतानाही निष्ठावंत,
प्रामाणिक कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी, व हाडाच्या काड्या करून विजय साकार केला.शेतकरी कामगार पक्ष हा स्वर्गीय आबासाहेबांचे विचार प्रमाण मानून पुढे चालणारा पक्ष आहे. हाच विचार आपल्याला पुढे जिवंत ठेवायचा आहे.
राजकारण आणि सत्ता हे समाजाचे परिवर्तन करण्यासाठी वापरायचे असते. स्वार्थासाठी लोभासाठी नव्हे त्यामुळे या विचाराशी कोणीही फारकत घेऊ नये. त्याचे कारण अशी की तुमच्या मनातील
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख गोरगरीब,कष्टकरी जनतेच्या प्रामाणिकपणावर प्रचंड मताने निवडून आले आहेत. आपल्याकडे अजून 58 महिने वेळ शिल्लक आहे. कोणीही काहीही सांगेल. अमिष दाखवले जाईल.
कार्यकर्त्याच्या मनामध्ये गैरसमज पसरवला जाईल.चीड निर्माण केली जाईल. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा चौकस विचाराचा कार्यकर्ता आहे. सत्ता असो अथवा नसो आपल्या विचाराशी तसूबरही फारकत करत नाही.
त्यामुळे येथून पुढील काळात माननीय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी व सांगोला तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेचे काम करण्यासाठी सज्ज आहेत.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठलेही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये.येत्या पाच वर्षाच्या काळात शेतकरी कामगार पक्षाची भिस्त प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ देणे असेल.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे, मतदारसंघात शांतता आरोग्य शिक्षणावर भर देणे, नोकरदार, गोरगरीब, कष्टकरी लोकांचे रक्षण करणे. थोडा संयम राखा वेळ आणि काळ आपलाच आहे.
जो कार्यकर्ता संयम शांतता सहनशीलता पक्षाशी एकनिष्ठ, वरिष्ठांशी प्रामाणिक जनतेशी प्रामाणिक पक्षाचे विचार प्रमाण मानणारा त्याच कार्यकर्त्याला समाज स्वीकारत असतो. आणि त्याच कार्यकर्त्यांचे भविष्य उज्वल असते.
0 Comments