धायटी – हलदहिवडी – उंबरगाव रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करण्यासाठी आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी….
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- अलीकडच्या काळात अनेक रस्त्यांची दुरावस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत.
सध्या सांगोला तालुक्यातील धायटी- हलदहिवडी – उंबरगाव रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करून रस्ता डांबरीकरण करून द्यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे. प्रवाशांना येणे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे त्रास नाहक त्रास होत आहे.
खराब रस्त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रवासी भाविक भक्तांना चांगल्या प्रकारचा रस्ता मिळावा असे बोलले जात आहे. धायटी, हलदहिवडी, उंबरगाव रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करावे याकडे
मा. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख साहेब यांनी लक्ष द्यावेत अशी मागणी केली जात आहे. यासह रस्त्यावरती अतिक्रमण साईटपट्टी, लहानमोठे खड्डे लहान मोठे झाडझुडपे
तसेच रात्रीचा व दिवसा वाहने येताजाता काही वेळा अपघात होत आहे अनेक अडचणीमुळे नागरिक त्रस्त असून, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे
0 Comments