ब्रेकिंग न्यूज..अख्ख्या सांगोल्यात वंदे मातरम चौकातील दारू विक्रीची चर्चा सुरू
असून प्रशासनाने यावर निर्बंध घालावेत. अशी मागणी सर्व स्तरातून जोर
सांगोला:- सध्या अनेक भागात राजेरोसपणे अवैद्य धंदे जोमात सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सांगोल्यात सध्या चोरीच्या प्रमाणातही खूपच वाढ होत आहे. सांगोला महूद, सांगोला चिंचोली शिरभावी, सांगोला एखतपुर लोटेवाडी, या तिन्ही गावांना जोडणाऱ्या
आणि न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, शहर महावितरण यासारख्या प्रमुख कार्यालयाकडे जाणाऱ्या तसेच बगीचा, दवाखाने, शिकवणी यासाठी नेहमीच महिलांची ये जा असणाऱ्या
सांगोल्याच्या महत्त्वाच्या आणि वरदळीचे प्रमुख ठिकाण म्हणून शहरातील वंदे मातरम चौक या चौकाची नोंद होते. या चौकामध्ये बगीच्यामुळे अनेक महिला मुली यांचा वावर आहे.
तसेच हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णांना देखील येजा करावी लागते. अशा वंदे मातरम चौकात आता अवैध दारू विक्रीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तिन्ही गावाला जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करत असताना तळीरामांचा त्रास होतो.
अनेकदा तळीराम यांनी केलेल्या शिवीगाळमुळे बगीचामध्ये येणाऱ्यांची संख्या ही कमी झाल्याची दिसून येत आहे. तसेच याचा फटका येथील छोट्या मोठ्या व्यवसाय धारकांना देखील बसत असून, शहर बीटचे पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत
असल्यामुळे आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्यामुळे याबाबत सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काही तरुण फलक झळकावून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत आहेत.
सांगोला तालुक्यातील दोन गावांमध्ये कुठेही दारू मिळेल असे फलक झळकल्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाईचा बडगा उभारला असल्याची माहिती मिळतं असल्यामुळे सांगोला शहरात कारवाई का होत नाही
याबाबत संतप्त भूमिका उमटत आहेत. अख्ख्या सांगोल्यात वंदे मातरम चौकातील दारू विक्रीची चर्चा सुरू असून प्रशासनाने यावर निर्बंध घालावेत. अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.
शहरातील वंदे मातरम चौक येथे कुठेही दारू मिळेल अशी चर्चा आख्या सांगोल्यात सुरू आहे. टपरी, शेड, तंबू यासमोर नेहमीच तळीरामांची गर्दी असते, आरवध भाषा, शिवीगाळ, हाणामारी तर काही वेळा महिलांची छेड यासारख्या घटना नित्य नियमाने सुरू असताना
संबंधित पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महिला, शालेय विद्यार्थिनी तसेच वयोवृद्ध नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी येथील तरुणांनी संतप्त भूमिका घेत,
चौकात कुठेही दारू मिळेल असा डिजिटल लावण्याची व सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर तरी पोलीस प्रशासन कारवाई करेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 Comments