खळबळजनक.. राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण, पुणे विमानतळावरून गायब, पोलिसांचा तपास सुरू
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी माहिती आहे.
पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. ऋषिराज सावंत असं अपहरण झालेल्याचे नाव असून ते पुण्यात राहत असल्याची माहिती आहे.
पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या मुलाचं अपहरण होणं ही बाब अतिशय गंभीर आहे. सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कुणी आणि कशासाठी केलं याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांचे एक पथक तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज परिसरातील निवासस्थानी पोहोचलं आहे.
त्या निवासस्थानी कुणाचे फोन आले होते का किंवा खंडणी मागण्यात आली होती का याची माहिती पोलिस घेत आहेत. या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत.
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन पुण्यातील कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली. एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे.
0 Comments