google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांची दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट

Breaking News

डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांची दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट


डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांची दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)



डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी दक्षता हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली.तसेच हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित असणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, 

इतर शासकीय योजना यामध्ये मेडिसिन, मूत्ररोग व अस्थीरोग,बालरोग  विभागामार्फत  सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना पूर्णपणे मोफत अतिशय चांगल्या प्रकारे मिळत असणारी 

आरोग्यसेवा पाहून हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक केले आणि शासकिय योजनेसंदर्भात हॉस्पिटलला व डॉक्टरांना भेडसावत असणाऱ्या विविध समस्या याची माहिती घेतली

 आणि हॉस्पिटलचे विविध विभाग -डायलिसिस युनिट,आय.सी.यु.,मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,2 डी इको - कार्डिआक आय.सी. यु.,लहान मुलांचा अतिदक्षता विभाग  या विभागांना भेट देऊन हॉस्पिटलच्या कामगिरीचे कौतुक केले.

सांगोला येथे दक्षता हॉस्पिटलमध्ये  सर्व हृदयविकार रुग्णांसाठी प्रथमच अल्पावधीतच सुरू होणाऱ्या "दक्षता - कॅथ लॅब" या विभागाच्या उभारणीचे काम पाहुन समाधान व्यक्त केले आणि हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments