google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानात उत्कृष्ट कामगिरी “सोलापूर ग्रामीण पश्चिम”... प्रदेश भाजप कडून सन्मान

Breaking News

संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानात उत्कृष्ट कामगिरी “सोलापूर ग्रामीण पश्चिम”... प्रदेश भाजप कडून सन्मान

संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानात उत्कृष्ट कामगिरी “सोलापूर ग्रामीण पश्चिम”... प्रदेश भाजप कडून सन्मान



मंगळवार दिनांक ०४/०२/२०२५ रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व सक्रिय सदस्य नोंदणी कार्यशाळा एसएनडीटी महाविद्यालय, मुंबई येथे संपन्न झाली. 

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानात महाराष्ट्रात राज्यातील ज्या जिल्ह्यात उत्कृष्ट सदस्य नोंदणी झाली 

अशा जिल्हाध्यक्ष व आमदार यांचा सन्मान सोहळा एसएनडीटी महाविद्यालय, मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याने ६२.७५% (२११४७३) सदस्य नोंदणी करून महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानावर असल्या कारणाने

  महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब* यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार -सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की मा. मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते झालेला सत्कार हा 

माझ्या एकट्याचा नसून सदस्य नोंदणीसाठी समर्पित भावनेतून राबवणाऱ्या सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.

सदस्य नोंदणीसाठी राबलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सलाम करतो. या विशेष सत्काराच्या निमित्ताने  सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज झाले, असे मी मानतो आणि सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,

 भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,  भाजप कार्यकारी अध्यक्ष व संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारी मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व वस्त्रोद्योग 

आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांत ( दादा ) पाटील साहेब राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. सौ. पंकजाताई मुंडे साहेब, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार साहेब, 

विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर साहेब महामंत्री आमदार मा. श्री. विक्रांत पाटील साहेब, महामंत्री मा. श्री. राजेश पांडे साहेब, महामंत्री मा. सौ. माधवीताई नाईक 

, महामंत्री मा. श्री. विजय चौधरी साहेब , महामंत्री मा. श्री. संजयजी केनेकर साहेब यांच्यासह राज्यातील सर्व सन्माननीय मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments