मोठी बातमी.. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गटाची भूमिका ठरणार महत्त्वाची…
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या. अनेक नवनवीन राजकीय समीकरणे समोर आली. महायुतीला मताधिक्य मिळाल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. नूतन आमदारांनी आपला पदभार देखील स्वीकारला आणि आपापल्या
मतदारसंघांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच विकास कामांची सुरुवात देखील केलेली आहे. आता अनेकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहे. अनेकांनी तर आपापली तयारी देखील दर्शवली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित करण्यासाठी योजना आखण्यास काहींनी सुरुवात देखील केलेली आहे.
सांगोला तालुक्यात अनेक वेळा स्वर्गीय गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील व मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे तिघेही एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या होत्या. मग तोच प्रयोग आता 2025 ला होणार का?
याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे नेमकी काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
ते स्वग्रही जातात की ते भाजपामध्ये जातील याच्या सध्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत की ते युतीतील कोणत्यातरी घटक पक्षात जातील व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबरोबर युती करून ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजले जाणारे
पंचायत समितीवर 58 वर्षानंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागतील अशा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत. नगरपालिका तसेच पंचायत समितीवर सत्ता मिळवायची असेल तर साळुंखे पाटील यांच्या गटाला खूपच महत्त्व आहे.
शेकापला किंवा बापूला या दोघांना साळुंखे पाटील गटाला बरोबर घेतल्याशिवाय सत्ता मिळवता येणार नाही हे विधानसभा निवडणुकी प्रसंगी स्पष्ट दिसून आल्याने साळुंखे पाटील जिकडे असतील तिकडे गुलाल दिसून येणार आहे या चर्चा सध्या जोर धरू लागलेल्या आहेत.
0 Comments