ब्रेकिंग न्यूज! मागील भांडणाचा राग मनात धरून सोलापुरात तरुणाचा खून
सोलापूर (प्रतिनिधी) मागील भांडणाचा राग मनात धरून २८ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेळगी येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा कपाळावर,
डोक्यात,डोळ्यावर लोखंडी स्टीलच्या स्टॅन्डने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.युवराज प्रभूलिंग स्वामी (वय-२०, रा.शिवगंगा नगर, शेळगी) असे त्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी की, शेळगी येथे येथील शिवगंगा नगर येथे राहणाऱ्या युवराज प्रभूलिंग स्वामी व संशयित आरोपी विजय उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल मरबे (दोघे. रा. दहिटणे) यांच्यात मैत्री होती.
युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचे समजते. त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते.घटनेच्या दिवशी या भांडणाचा राग मनात
धरून २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाजता सुमारास विजय बनसोडे व सुजल मरबे या दोघांनी युवराज यास मोटरसायकलवर बसवुन
रात्री नऊच्या सुमारास शेळगी दहिटणे रस्त्यावरील निर्मल डेव्हलपर्सच्या प्लॉटिंग होत असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली. त्याच्या कपाळावर,डोळ्यावर,डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले.
ही घटना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कळताच संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले.
गंभीर बेशुद्ध अवस्थेत त्या तरुणास उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी (वय-१८) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात विजय बनसोडे व सुजल मरबे या दोघांनी माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिला आहे.
दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने रातो-रात कौशल्यपूर्ण तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मदुपोनि.शेख या करीत आहेत.
0 Comments