google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

सांगोला शहर व तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना


महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी सांगोला शहरात व तालुक्यातील

 भीमसौनिकांसह विविध राजकीय, सामाजिक, शौक्षणिक तसेच विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी हजेरी लावून सांगोला भिमनगर येथील बुध्दविहारातील डॉ.बाबसाहेब आंबेडकर

 यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करित अभिवादन केले. महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भीम अनुयायांनी गजबजून गेला होता.

डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी भीमनगर येथील दीक्षा भूमी कट्ट्यावरील महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून, बुद्धविहारातील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर त्रिशरण पंचशील, भिमस्मरण, भिमस्तुती ग्रहण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदरांजली वाहण्यात आली.

सकाळपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 सांगोला येथील भीमसैनिक यांच्याकडून डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्च काढून शांतीज्योत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी व बहुजन बांधव सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments