ब्रेकिंग न्यूज..पोलिसांच्या आशीर्वादाने कॅफेचा धंदा जोमात.... सांगोल्यातील कॅफेच्या अंधाऱ्या खोलीत 'इश्काचा खेळ' रंगतोय
सांगोला :- सांगोला शहरात कॅफेच्या अंधाऱ्या खोलीत 'इश्काचा खेळ' रंगत आहे. युवकांच्या इश्काच्या खेळाला चार चाँद लावण्यात कॅफे चालकांकडून देखील हातभार लावला जात आहे.
त्यासाठी कॅफे चालकांकडून तरुण आणि तरुणींना 'विश्रांती' घेण्यासाठी 'खास' सोयदेखील करण्यात येत आहे.
पोलिसांच्या आशीर्वादाने हा खेळ खुलेआम सुरू आहे . यावर संबंधितांनी निर्बंध घालावे अशी मागणी जाणकार वर्गातून जोर धरत आहे. ऐन तारुण्यात आलेल्या तरुण आणि तरुणींना एकमेकांविषयी आकर्षण असणे स्वाभाविक आहे.
महाविद्यालय, समाजमाध्यमातून तरुण आणि तरुणींची ओळख होते. परंतु त्यांना गप्पा मारण्यासाठी एकांत मात्र मिळत नाही.
त्यांची ही अडचण हेरून, पैसा मिळविण्यासाठी काहीजणांनी कॅफेच्या नावाखाली गोरखधंदा सुरू केला आहे. शहरात अनेकांनी कॉफी शॉपच्या नावाखाली कॅफे सुरू केले आहेत.
या ठिकाणी येणाऱ्यांना कॉफी तर मिळतेच, शिवाय फास्टफूडची देखील सोय करण्यात आलेली असते. तसेच जर कॉफी एकांतात शेअर करायची असेल, तर त्याची देखील सोय या कॅफे चालकांकडून करण्यात आली आहे.
परंतु त्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर मात्र कॅफेत बनविलेल्या कंपार्टमेंटमध्ये बसून एकमेकांना 'निवांत क्षण' घालविता येतात.काही तरुण, तरुणींना 'विश्रांती' घ्यायची असेल, तर त्याची देखील
'खास' सोय या कॅफे चालकांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कॅफेमध्येच अडगळीच्या खोलीमध्ये बसण्यासाठी आसन, झिरो बल्ब लावून एक माहोलच कॅफे चालकांकडून तयार करण्यात आला आहे.
यातून कॅफे चालकांची कमाई देखील जोमात आहे. अर्थात काही जणांचे खिसे गरम केल्याशिवाय तरी हे शक्य नाही. एकांत मिळत असल्याने जोडप्यांची पावले देखील आपसुकच या कॅफेकडे वळत आहेत.
याचा गैरफायदा देखील उठविला जात असल्याचे दिसून येते. ऐन तारुण्यात प्रेमाच्या रंगाला चार चाँद लावण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अनेकांचा या कॅफेत पाय घसरत असल्याचे देखील आता समोर आले आहे.
कॅफेमध्ये येणाऱ्या जोडप्यांची संख्या मोठी आहे. कॅफेमध्ये या सुविधा कशासाठी करण्यात येतात, हे सर्वश्रुत आहे.
कॅफेत सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने अनेकांचा कॅफेकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खुलेआमपणे असा गोरखधंदा काहीजणांनी चालविला आहे.
अनेक कॅफेमध्ये तरुण आणि तरुणींचा इश्काचा खेळ रंगत आहे. याला आता कोठेतरी आळा बसण्याची गरज असल्याचे तालुक्यातील जाणकार मंडळी मधून बोलले जात आहे. कॅफे म्हणजे लॉजमधून पळवाट...
अनेक जोडपी भेटण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी लॉजचा वापर करीत होती. लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी ओळखपत्र मागितले जाते. परंतु अनेकांना ओळख लपवून भेटण्याची इच्छा असते.
त्यामुळे अनेकजण कॅफेचाच पर्याय निवडतात आणि याचाच गैरफायदा घेऊन काही तासासाठी अवाच्या सवा दर त्यांच्याकडून आकारून त्यांची लूट करण्यात येत आहे. खुलेआम गोरखधंदा
शहरात अनेक ठिकाणी खुलेआम कॅफे सुरू आहेत. परंतू आता या कॅफेमध्ये काय चालते, येथे कोण कोण येतात,
याची कल्पना पोलिसांना नसावी का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात असे कॅफे चालविण्यासाठी अनेकांचे खिसे गरम करावे लागतात,
हे मात्र निश्चित. त्यामुळे कॅफे चालकांना देखील कारवाईची भीती नसावी का? कॅफेच्या नावाखाली सुरू असणारा हा गोरखधंदा बंद होण्याची आवश्यकता आहे.
0 Comments