google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला

Breaking News

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला ;


नातेवाईक आक्रमकसंबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तरच मृतदेह ताब्यात घेऊ : ग्रामीण रुग्णालय व पोलीस प्रशासनाने काढली समजूत

सांगोला / सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

जोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्र नातेवाईकांनी घेतला होता. यावर रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी

 डॉक्टर अरविंद गिराम व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. संतोष विठ्ठल नायकुडे वय 40 वर्ष राहणार अचकदाणी असे रुग्णाचे नाव आहे. 

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संतोष विठ्ठल नायकुडे यांना छातीत दुखू लागल्याने व उलटीचा त्रास होऊ लागल्याने रायीबाई नायकुडे यांनी उपचारासाठी 

सांगोला ग्रामीण रुग्णालयात शनिवार दिनांक 16 रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांना दवाखान्यामध्येच मुक्कामी राहावे लागेल असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता 

त्यानुसार संतोष नायकुडे यांच्या मातोश्री सोबत ते दवाखान्यामध्येच उपचाराधीन होते. दरम्यान रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कागदपत्रांची झेरॉक्स आणण्यासाठी त्यांच्या

 मातोश्री दवाखान्या बाहेर जात असताना, तुला मोबाईल मधील व झेरॉक्स मधील समजणार नाही म्हणून आईला दवाखान्यात बसून उपचार घेत असलेले संतोष नायकुडे दवाखान्या बाहेर पडले होते.

 दरम्यान त्यांचा वंदे मातरम चौक सांगोला या ठिकाणी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच दवाखान्या बाहेर उपचाराधीन असलेला रुग्ण बाहेर गेलाच कसा, असा ठपका त्यांच्या नातेवाईकांनी ठेवत 

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 40 वर्षीय उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तरच आम्ही 

मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यावेळी अचकदानी येथील ग्रामस्थांनी दवाखान्यासमोर मोठी गर्दी केली होती. यावर ग्रामीण रुग्णालय प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी हस्तक्षेप करीत 

नातेवाईकांना संबंधितावर कारवाई करू असे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. परंतु उशीर पर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. काल रविवारी उशिरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments