google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने 75 वा संविधान दिन, शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करावी:- विनिताताई कामटे

Breaking News

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने 75 वा संविधान दिन, शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करावी:- विनिताताई कामटे

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने 75 वा संविधान दिन, शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर




व विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करावी:- विनिताताई कामटे

सांगोला. (प्रतिनिधी) सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय (रजी .)सामाजिक संघटनेच्यावतीने मंगळवार दि  26 नोव्हेंबर 2024 रोजी शहीद  दिन, संघटनेचा 15 वा वर्धापन दिन तसेच  75 व्या 

संविधान दिनानिमित्त भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईतील झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण होत आहे .

 शहिदांच्या स्मरणार्थ सांगोल्यात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक सचिव प्रा .प्रसाद खडतरे सर यांनी संघटनेच्यावतीने दिली.

 स्टेशन रोड येथे विटा बँकेसमोर मंगळवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या  शुभहस्ते संपन्न होणार आहे , सकाळी 9 ते 6 या वेळेत  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, वीर माता ,

पिता व माजी सैनिक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी 4 वाजता भव्य किल्ले स्पर्धा 2024 बक्षीस वितरण, 26/11 तील शहिदांना आदरांजली वाहने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भारतीय 75 वा संविधान दिन  ,संघटनेचा 15 वा वर्धापन दिन व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सदर शिबिराचे आयोजन गेल्या 15 वर्षापासून करण्यात येत आहे. सध्या  रक्ताची तीव्र टंचाई असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजनाचा 

हेतू असल्याचे सांगितले .प्रत्येक रक्तदात्यांना संघटनेच्या कार्यालयात  रक्तदात्यांनी एकाच वेळी गर्दी न करता आपली आगाऊ रक्तदान नोंदणी संघटनेच्या स्टेशन रोड येथील शिंदे मशिनरी स्टोअर्स स्टेशन रोड ,

सांगोला कार्यालयात दिनांक  20 नोव्हेंबर 2024 पासून सुरू केलेली आहे या कालावधीत करून शहीद दिनी गर्दी होऊ नये याकरता संघटनेने 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत शिंदे मशिनरी स्टोअर्स स्टेशन रोड सांगोला येथे नोंदणी सुरू केली आहे .

 कार्यक्रमाच्या व शिबिराच्या नोंदणी माहिती करिता कार्याध्यक्ष चारुदत्त खडतरे भ्रमणध्वनी क्रमांक 7887522929 यांच्याशी संपर्क साधावा.

यापूर्वीसुद्धा आपण  अशोक कामटे संघटनेच्या विनंतीस मान देऊन याच सामाजिक उपक्रमात अनेकवेळा सहभागी झाले असून भविष्यात गरजू रुग्णांना रक्ताची गरज

 भागवण्यासाठी आपल्या रक्तदान करण्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो त्याचबरोबर वीर पत्नी विनिताताई कामटे यांनीही रक्तदानाने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी असा संदेश दिलेला आहे,

 म्हणून अशा सामाजिक कार्यास आपण शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करावी असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केले आहे.

Post a Comment

0 Comments