मोठी बातमी.. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
सांगोला विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला विधानसभा निवडणुकीत प्रथमच तिरंगी सामना शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आ. शहाजीबापू पाटील, शेतकरी कामगार पक्षाकडून स्व. गणपतराव देशमुख यांचे
नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिपक साळुंखे पाटील असा रंगला होता. स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत
असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल.. एकदम ओके हाय.. हा डायलॉग फेम आ. शहाजीबापू पाटील याच मतदार संघातून निवडणूक लढवीत होते.
त्यामुळे आपले आजोबा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याबरोबर गेली 40 ते 45 वर्ष राजकारण करणाऱ्या दोन मातब्बर नेत्यांविरुद्ध राजकारणात नवखे असणारे डॉ. बाबासाहेब देशमुख हे कसे टक्कर देतील याकडेही मतदारांचे लक्ष लागले होते.
परंतु डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या बंधूंनी स्व. गणपतराव देशमुख यांचे विचारांची लढाई पुढे सुरू ठेवून तालुक्यातील सर्व मतदारांना विश्वासात घेवून अतिशय शांततेच्या मार्गाने निवडणूक प्रचार वेगाने केला.
त्यामुळे तालुक्यातील जनतेने एक चांगले विचार घेऊन डोळ्यासमोर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सांगोला तालुक्याला विकासाच्या शिखरावर नेतील असा विश्वास डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर विश्र्वास ठेवून प्रचंड मतांनी निवडून दिले.
सांगोला विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याबद्दल डॉ. बाबासाहेब यांचा मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सन्मान करून अभिनंदन केले.
यावेळी मान खटाव तालुक्याचे नवनिर्वाचित आ. जयकुमार गोरे, सांगोला तालुक्याचे युवक नेते अनिकेत देशमुख, शेकापचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे अशी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments