google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवघ्या दोन दिवसात मिळाले १७ लाख रुपयाचे उत्पन्न विधानसभा निवडणुकीत सांगोला एसटी बस मालामाल

Breaking News

अवघ्या दोन दिवसात मिळाले १७ लाख रुपयाचे उत्पन्न विधानसभा निवडणुकीत सांगोला एसटी बस मालामाल

अवघ्या दोन दिवसात मिळाले १७ लाख रुपयाचे उत्पन्न विधानसभा निवडणुकीत सांगोला एसटी बस मालामाल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)

सांगोला  : २५३ सांगोला विधानसभा निवडणुकीत मतपेट्या व अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी सांगोला एसटी बस स्थानक विभागाने ९४ बसेस दिल्या होत्या. 

९४ बसेसने मतदान केंद्रावर मतपेट्या पोहचविण्यासह मतदान केंद्रावर अधिकारी - पोलीस बंदोबस्त पोहचवून व मतदान झाल्यानंतर 

मतपेट्या सुरक्षित तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या एस.टी. या बसेसच्या भाड्यापोटी महामंडळाला १७ लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती सांगोला बस स्थानक विभागाने दिली आहे. 

    निवडणुक कामी मतदानाच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांप्रमाणेच एसटीची मदत घेण्यात येते. मतदानयंत्रे व पेट्या मतदानकेंद्रांवर सकाळीच पोहोचविणे व वेळ संपल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षित स्थळी

 घेऊन येण्यासाठी बसचा वापर केला जातो. सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी एस. टी. महामंडळाच्या सांगोला बस स्थानक विभागाकडे उपलब्ध बसेस ची मागणी करण्यात आली होती.

 दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मतपेट्या पोहचविण्यासाठी सकाळ पासूनच ५० बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. तसेच २० नोव्हेंबर रोजी देखील मतपेट्या आणण्यासाठी ४० बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. 

प्रवासी वाहतुकीपेक्षा मतपेट्या वाहतुकीत महामंडळाला एका दिवसात दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. ९० बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक विभागाने महामंडळाच्या सांगोला एसटी विभागाला १७ लाख रुपयांचा धनादेश महामंडळाच्या तिजोरीत जमा होणार आहे. 

यासह त्याच दिवशी सांगोला एस टी बस स्थानकातून प्रवाशांची चढ उतार यामधून ५ लाख असे एकूण २२ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न सांगोला एसटी आगारास मिळाले आहे. 

  सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३०५ मतदान केंद्रावर मत पेट्या पोहोचवण्याबरोबर पोलीस कर्मचारी सोडविण्यासाठी एसटी बसेस पाठविण्यात आल्या होत्या. 

   विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मतपेट्या पोहचविण्यासह ठिकठिकाणच्या गावांना पोलीस बंदोबस्तदेखील एस.टी. बसमधून नेण्यात आला होता. 

यासाठी दोन दिवस ९० बसेस पुरविण्यात आल्या होत्या. मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची जुळवाजुळव करण्याचे काम प्रशासनाकडून केले होते. 

यामध्ये मोठ्या प्रमाणावर एसट्या बुक करण्यात आल्या होत्या. यामुळे महामंडळास लाखोंचा हातभार मिळाला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत एसटी मालामाल झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments