शिवसेना शिंदे गटाच्या 50 पैकी एकाचा पराभव; काय झाडी, काय डोंगर वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील पराभूत
सांगोला: विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. दरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भाजपबरोबर, शिवसेना, राष्ट्रवादीची जोरदार कामगिरी पाहायला मिळत आहे.मात्र शिवसेना शिंदे गटाचा एक शिलेदार पराभूत झाला आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजीबापू पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. या मतदारसंघातून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५,३८४ मताने विजयी झाले आहेत.
माझ्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकजरी पडला तरी राजकारण सोडून निघून जाईन असे एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते :
बाबासाहेब देशमुख - १,१६,२८०
शहाजीबापू पाटील - ०,९०,८९६
दीपकआबा साळुंखे - ०,५१,०००
शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.
0 Comments