सरकार मराठा समाजास न्याय देण्यास असफल ठरले म्हणून शिवसेना (शिंदे गट) तालुका समन्वयक पदाचा दिला राजीनामा : रणसिंह देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (शिवसेना शिंदे गट) सांगोला तालुका समन्वयक पदाचा रणसिंह विठ्ठल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. आम. शहाजीबापू पाटील यांच्याकडे राजीनामाचे पत्र पाठवण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने मराठा समाजास न्याय देण्यासाठी शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या सांगोला तालुका समन्वयक या पदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा देण्याचे
कारण असे की आपण विधानसभेत असून देखील मराठा समाजाची भूमिका आपण विधानसभेत मांडली नाही तसेच. आपले सरकार मराठा समाजास न्याय देण्यास असफल ठरले आहे.
त्यामुळे मी मराठा समाज व इतर समाजातील कार्यकर्त्यांसह आपल्या शिवसेना या पक्षाचा राजीनामा देत आहे.
तो स्वीकारावा असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पुढील काळात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने राजकारणाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले आहे.
0 Comments