google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

Breaking News

खळबळजनक घटना...जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

खळबळजनक घटना...जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ


पुणे : सिंहगड परिसरातील धायरीत दारु पिल्यानंतर ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून तरुणाचा खून केल्याची घटना मध्यरात्री घडली.

 तरुणाला बांबूने मारहाण करत तसेच दगडाने डोके ठेचून हा खून करण्यात आला.याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य घोरपडे (वय २१ , रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, तसेच त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. 

आदित्यची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धायरी रस्त्यावरील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य घोरपडे आणि त्याचे मित्र नऱ्हेतील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारु पिण्यास गेले होते. दारु प्यायल्यानंतर त्यांनी जेवण मागविले. जेवण करताना आकाश आदित्यच्या ताटात हात घालून खाऊ लागला. 

तेव्हा आदित्यने माझ्या ताटातील घेऊन कशाला खातो, अशी विचारणा केली. आदित्य आणि आकाश दारुच्या नशेत होते. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आकाश तेथून निघून गेला.

आदित्य आणि त्याचे मित्र जेवण करुन बाहेर पडले. धायरी रस्त्यावरील त्रिमूर्ती किराणा दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास आकाश आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आदित्यला गाठले. त्याला बांबूने बेदम मारहाण केली, 

तसेच त्याच्या डोक्यात दगड मारला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, निखिल पिंगळे, सहायक आयुक्त अजय परमार, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर,

 गुन्हे निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस निरीक्षक भोस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments