google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर दिपकआबांना आमदार ‘करणार म्हणजे करणार...’ येणार्‍या आदेशाचे पालन करणार ः शिवसेना नेते (ठाकरे गट) भारत(नाना) गवळी

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर दिपकआबांना आमदार ‘करणार म्हणजे करणार...’ येणार्‍या आदेशाचे पालन करणार ः शिवसेना नेते (ठाकरे गट) भारत(नाना) गवळी

ब्रेकिंग न्यूज..मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर दिपकआबांना आमदार ‘करणार म्हणजे करणार...’


येणार्‍या आदेशाचे पालन करणार ः शिवसेना नेते (ठाकरे गट) भारत(नाना) गवळी

सांगोला :- विधानसभेची निवडणुक जाहीर झाली असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिपकआबांनी निवडणुक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. तरी मातोश्रीवरून आदेश

 आल्यानंतर दिपकआबा साळुंखे-पाटील यांना आमदार  ‘करणार म्हणजे करणार...’ आणि तेही प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भारत(नाना) गवळी यांनी केली 

असून दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी मशाल चिन्ह घ्यावे यासाठी सर्व निष्ठावंत शिवसैनिक दिपकआबा साळुंखे-पाटील यांची भेट घेवून विनंती करणार असल्याचेही सांगितले. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मातोश्रीवरून आदेश आला त्याप्रमाणे दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून शहाजीबापू पाटील यांना आमदार केले. पण त्यांनी शिवसेनेचीच नाही 

तर आख्या सांगोला तालुक्याची फसवणुक केली 5 वर्षे कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही, त्यांची विचारपुसही केली नाही

 त्यामुळे त्यांचा पराभव केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. त्याचबरोबर सर्वच पक्षातील नेतेमंडळींची व सर्व सामान्यांची कामे करणारा नेता म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांची ओळख आहे. 

सांगोला तालुक्यात 2024 च्या निवडणुकीत वेगळवेगळ्या पक्षातून जेवढे उमेदवार निवडणुक रिंगणात अर्ज भरतील त्यामध्ये दिपकआबा साळुंखे-पाटील हे 24 तास सर्वसामन्यांची रात्रंदिवस कामे करणारा एकमेव उमेदवार असेल 

दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातूनच मशाल चिन्हावर निवडणुक लढवावी अशी आम्ही सर्वच शिवसैनिक दिपकआबा साळुंखे-पाटील यांची भेट घेवूून मागणी करणार आहोत व मशाल चिन्ह घेण्यास भाग पाडणार आहोत.

 त्यामुळे मातोश्री वरून येणार्‍या आदेशाचे पालन करून दिपकआबा साळुंखे-पाटील यांना आमदार करणार म्हणजे करणार असे शिवसेना नेते (ठाकरे गट) भारत(नाना) गवळी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments