सकल मातंग समाजाच्या एकसंघपणाला आडफटा आणून मातंग समाजात
फूट पाडणाऱ्याना समाज जागा दाखवून देईल.
स्व. सुनिल कांबळे यांच्या हत्येचे स्वतःच्या राजकीय, सामाजिक फायद्यासाठी पोळी भाजून घेणाऱ्यापासून तालुक्यांतील मातंग समाजाने दक्ष रहावे.
जय लहुजी !! जय भीम !!
काही महिन्यांपूर्वी महुद ता. सांगोला येथे मातंग समाजातील तरणाबांड युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावारूपास आलेल्या सुनिल कांबळे या युवकांची हत्या करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम सकल मातंग समाज सांगोला तालुका यातील प्रमुख नेत्यांनी झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला.त्यानंतर स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येने तालुक्यांतीलच नाही
तर राज्यातील मातंग समाज एकसंघ झाला. राज्यातील सामाजिक चळवळीतील नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. काहींनी या कुटुंबाला मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदतीचा हातभार लावला.
झालेल्या घटनेने संपूर्ण राज्य हळहळले. या घटनेने तालुक्यातील सकल मातंग समाज एकत्र झाला. आणि सांगोला तहसील कार्यालयावर न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढला.
सकल मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकच म्हणणे आणि एक वाक्यता होती, की स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी द्यावी, मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे.
सदर गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. या मागण्यानी मातंग समाजातील नागरिकांच्या उद्रेकाचा स्फोट होईल या भीतीने पोलीस प्रशासनाने सुनिल कांबळे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना पकडले.
या घटनेने तालुक्यांतील मातंग समाज लहुजी वस्ताद यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र या आणि स्वाभिमानाने
जगा या वचना जागून, संपूर्ण सांगोला तालुक्यातील मातंग समाज एकत्र आला, आणि स्व सुनिल कांबळे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला.
परंतु या घटनेने तालुक्यांतील सकल मातंग समाजात उभी फूट पाडण्याचे काम काही जणांनी केले. काही जणांनी तर स्व सुनिल कांबळे हयात असताना त्यांच्या सोबत कधीही सख्य नव्हते.
मात्र यावेळी स्वतःचा राजकीय स्वार्थ भाजण्यासाठी आणि स्वतःचे राजकारण उभे करण्यासाठी स्व सुनिल कांबळे यांच्या नावाचा गैर फायदा घेतला. हे सर्व सकल मातंग समाज जाणून आहे.
स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येनंतर घाबरलेल्या कुटुंबाला सकल मातंग समाजाने साथ दिली, अजूनही देत आहेत, पण काही समाजातील स्वतःला "भैय्या, म्हणणारे, युवा नायक म्हणणारे
यांना मात्र समाजाने चांगलेच ध्यानात ठेवले आहे. अजून कांबळे कुटुंबीय दुःखातून सावरते न सावरते तोपर्यंत या युवा पट्ट्यानी स्व सुनिल कांबळे यांच्या नावाचा फायदा घेत
स्वतः नेतृत्व करण्यासाठी सकल मातंग समाजात फूट पाडण्यासाठी स्वतःची सामाजिक संघटना काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. यांच्या टोळक्यानी त्यात ही काही कमी की
काय मूठभर मातंग समाजातील युवकांना सामाजिकतेचे धडे देत थेट आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. तर काहींनी राजकारणातून काही तरी मोठें करण्याची जिद्द बाळगली आहे.
तुम्हाला स्वतःचे राजकारण करायचे होते, तर स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येनंतरच सकल मातंग समाज तुम्हाला दिसला का? आपण बहुजन समाजातील घटक आहे,
अशी स्वतःची बडवून सांगणाऱ्याना आताच मातंग समाजाचा पुळका का आला ? मातंग समाजातील आपले योगदान काय ? हे तरी सकल मातंग समाजाला तुम्ही सांगा.
स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला असल्याचा गाजावाजा करुन आयजी फुलारीसाहेब,
एसपी अतुल कुलकर्णी, डीवायएसपी विक्रांत गायकवाड, आणि पी आय समोर तुम्ही कबूल करुन कांबळे कुटुंबियांना न्याय मिळवून दिला असे आपणच सांगितले.
सकल मातंग समाजाला कानाचा कोपरा न कळू देता गुपचूप चोरासारखे समाजाला न सांगता, अंधारात ठेवून पंढरपूर येथे जाता आणि गुलाबाचा हार तुम्ही आयजीना घालता आणि समाधान व्यक्त करता.
हून्नुरच्या बिरोबाच्या बनात डीवायएसपी बरोबर wh up स्टेटस ठेवता, तपास योग्य केला असल्याचे गाजावाजा केला. त्यानंतर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी तुम्ही जात
असल्याचे समाजाला कळविले असते तरी आपल्या या भूमिकेचे समाजाने स्वागत केले असते.पण तुम्ही या घटनेच्या पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत समाज म्हणून एकत्र आलेल्या भोळ्या भाबड्या समाज
बांधवाना किमान सोशल मीडियावरून तरी कळविले असते तरी समाजाने आपले कौतुक केले असते.याउलट आपले नेतृत्व दाखविण्याकरिता wh ग्रुपवर आयजी,
आणि एसपी बरोबरचे फोटो शेअर करून आम्ही समाजासाठी किती झटतोय तो दाखवायचा प्रयत्न केला, "भैय्या साहेब समाज सब कुछ जानता है" !!
समाजानेच मोठे केलेल्या युवा नायकाने तर समाजाच्या नावावर हद्द केली, सांगोल्यातील एका पंच तारांकित हॉटेल मध्ये तालुक्यांतील युवकाना ओली पार्टी देवून संघटना स्थापन केली,
आणि तालुक्याचा आमदार मीच ठरविणार हा केविलवाणा प्रकार दाखविण्याचा प्रयत्न. सकल मातंग समाजातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी जरा सबुरीने घेण्याचा सल्ला दिला, पण ऐकायच्या मनस्थितीत
युवा नायक नसल्याने सकल मातंग समाजातील काही युवकांनी मात्र या बैठकीतून माघार घेतली. एकंदरितच काय सकल मातंग समाजाला बदनाम करण्याचे काम काही समाजातील महाभाग करीत आहेत,
समाजातील काही जुन्या जाणत्या आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यासाठी करीत असलेला हा अट्टाहास समाजाने ओळखला आहे.
सकल मातंग समाजाला सांगोला शहरात स्मृतीभवन बांधनेकामी आम. शहाजी बापू पाटील यांनी एक कोटी मंजूर केलेबद्दल, नवनिर्वाचित विधान परिषद आमदार म्हणून निवड झालेले आमदार अमित गोरखे,
जात निहाय अ. ब. क. ड वर्गिकरणासाठी राज्यात लढा उभारणारे विष्णू भाऊ कसबे, दलित चळवळीचे अभ्यासक अंकल सोनवणे यांच्या जंगी सत्काराचे आयोजन सकल मातंग समाजाच्या वतीने सांगोला येथे करण्यात आले होते.
सकल मातंग समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम या दोघांनी अगदी एका राजकीय पक्षांची सुपारी घेवून केला असल्याची चर्चाही आता मातंग समाजापासून लपून राहिली नाही.
याउलट सकल मातंग समाजातील ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करून आपण समाजामध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे महापाप केले आणि करीत आहेत. जर अशी वागणूक आपली
असेल तर भगवान के घर मे देर है, अंधेर नही हे ध्यानात ठेवून समाजाची प्रतारणा करू नका, अशीच तालुक्यांतील सुजाण मातंग बांधवांची इच्छा आहे.
स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येनंतर आपण सकल मातंग समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. ज्यांनी हा मोर्चा हाताळला त्याच समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा
"दलाल"म्हणून बिन बुडाचा आरोप करून मातंग समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान केला. ही गोष्ट समाज कधीच विसरणार नाही.
ज्या विद्यमान आमदारांना भर मोर्चात तुम्ही शिव्या दिल्या, त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली, मुख्य सूत्रधाराला विद्यमान आमदार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला, इथपर्यंत समाज खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा ही राहिला.
पण समाजाला न सांगता टीका टि्पणी करणाऱ्या आमदारांकडून तुम्हीच पुढाकार घेवून व समाजातील इतर समाज बांधवांना घ्यावयाचे नाही
अशा अटी घालून पिडीत कुटुंबाला पाच लाखाची मदत घेतली आणि स्वतच्या घरी नेवून मांडीला मांडी लावून समाजाची फसवणूक केली.
ही गोष्ट मात्र समाज विसरणार नाही. बंद खोलीमध्ये समाजाला अंधारात ठेवून आमदारासोबत झालेली चर्चा उघडपणे
आपल्यात धमक असेल तर सांगावी एका कार्यक्रमात विद्यमान आमदारांसोबत मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि त्यांच्या सन्मान करण्याच्या कार्यक्रमावर मात्र तुम्ही बहिष्कार घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करता ,
हे कोणत्या तत्त्वात बसते. हि तुमची दुटप्पी पणाची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे. समाजाने हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
जय भवानी चौकात विद्यमान आमदारानी स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येबद्दल त्यांनी मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी केलेले वक्तव्ये नक्कीच चुकीचे आहे.
सकल मातंग समाज या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.आजही विद्यमान आमदारांचा जाहिर निषेध व्यक्त करत आहे.
समाजातील दोंघा चौघांनी एका विशिष्ठ राजकीय पक्षांची सुपारी घेवून समाजाची प्रतारणा आणि हेळसांड करण्याचा जो कार्यक्रम चालविला आहे, तो निषेधार्थ आहे .
तसेच सदर प्रकरणामध्ये मातंग समाज आणि विद्यमान आमदार यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचा फायदा घेऊन एखादा राजकीय पक्ष आपणास मदत करत असेल तर त्या पक्षाचाही सकल मातंग समजाच्या वतीने जाहीर निषेध करतो .
इथे स्व सुनिल कांबळे यांच्या हत्येचे दुःख अजून समाज विसरलेला नसताना एक पक्ष मात्र अशा काही जणांना सोबत घेऊन समाजामध्ये फूट पाडण्याचे कार्य करीत आहे.त्या पक्षाचा ही सकल मातंग समाज जाहीर निषेध करीत आहे.
येणाऱ्या काळात ग्रामीण, शहरी असा कोणताही भेदभाव न करता सकल मातंग समाज चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना नक्कीच जागा दाखवेल.
सांगोला तालुक्यातील मातंग समाज अतिशय सुज्ञ असून तो कोण्या व्यक्तीशी बांधील नाही तर तो लहुजी, फुले,शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांशी बांधील आहे.
त्यामुळे समाजाची दिशाभूल करून स्वतः मोठे होवू पाहणाऱ्या, स्वयंघोषित नेत्यांना सांगोला तालुक्यातील सकल मातंग समाज नक्कीच जागा दाखवेल यात शंकाच नाही.
जय लहूजी !! जय भीम!!
सकल मातंग समाज सांगोला तालुका.
0 Comments