उत्तम (दादा) खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन...!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी \ लोटेवाडी गावचे सुपुत्र श्री.उत्तम (दादा) खांडेकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे दि.०९.०९.२०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे सदर चे महाआरोग्य शिबिर लोटेवाडी ता.सांगोला येथे होणार आहे.
उत्तम दादां हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबवून सर्व परिसर निसर्गरम्य केलेला आहे.
ते २००९ ते २०१४ साली सरपंच पद भूषवलेले महान असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून दिन दलित वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वही पुस्तक वाटप विविध कार्यक्रम घेऊन सन्मान करण्यात आला आहे.
व सर्व घटकातील लोकांना सर्व समसमान न्याय देण्याचे काम हे उत्तम (दादा) खांडेकर यांच्याकडून पहावयास मिळत आहे. त्याची राजकीय कारकीर्दही एकदम संघर्षमय आहे. त्यांनी
भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष या पदावर असून ते योग्य प्रकारे काम करत आहेत. सदर ते रतन चंद शहा बँक लि. मंगळवेढा या बँकेचे संचालक म्हणून ही काम पाहत आहेत. अशा या भव्य महाआरोग्य शिबिरासाठी
सांगोला तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार श्री शहाजी (बापू) पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दीपक (आबा) साळुंखे पाटील,बाबासाहेब देशमुख,
अनिकेत देशमुख, चेतन सिंह केदार- सावंत, खंडू सातपुते, दादासाहेब लवटे, सरपंच उपसरपंच अशा सर्व नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने या शिबिरासाठी लाभलेले डॉ. एम. के इनामदार,डॉ. पीयूष साळुंखे पाटील, डॉ. मेघना देवकते, डॉ.प्रकाश लवटे,शितल शहा, डॉ. सागर करांडे, डॉ विजय भोसले, डॉ
. प्रतापसिंह पाटील,श्री. सौरभ अजळकर, डॉ.संदीप देवकते सर्व डॉक्टर्स उपस्थित राहून महाआरोग्य शिबिरासाठी योग्य मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व आरोग्य शिबिरासाठी सर्व कर्मचारी,
सर्व आरोग्य कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी व सर्व ग्रामस्थ लोटेवाडी या शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तम (दादा) खांडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
0 Comments