ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यात ड्रोन बाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.!
हायवेचे सर्वेक्षण सुरू असल्याची पो.नि.भिमराव खणदाळे यांची सविस्तर सविस्तर माहिती.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोलाःगेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री-अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या
काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, नाझरा, बलवडी, चोपडी, चिणके, घेरडी, हंगीरगे, वाकी, आलेगाव, जवळा परिसरात रात्री अपरात्री आकाशात अनेक ड्रोन घिरट्या घालत असताना निदर्शनास येत आहे.
ड्रोनच्या माध्यमातून चोर रेकी करून चोरीची तयारी करत असल्याच्या अफवेमुळे सांगोला तालुक्यात रात्रभर महिला,
लहान मुले वयोवृद्ध नागरिक तसेच सर्वच नागरिक भयभीत होत होते. शिवाय ड्रोनच्या बाबतीत
सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या अफवामुळे ग्रामीण भागातील जनतेत आणखी असुरक्षितता भावना वाढू लागली होती
मात्र यापैकी कोणत्याच गोष्टींमध्ये तथ्य नसून रात्री आकाशामध्ये घिरट्या घालणारे
ड्रोन हे ड्रोन नॅशनल हायवे चे सर्वेक्षण करणे कामी नेमले असून त्यामुळे हे नॅशनल हायवे चे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती
मिळळी असून याबाबत कसोशीने तपास सुरू असल्याची माहितीपोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली
0 Comments