google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..'त्या' लाडक्या बहिणींकडून होणार वसुली, नक्की कारण काय? वाचा सविस्तर.

Breaking News

खळबळजनक..'त्या' लाडक्या बहिणींकडून होणार वसुली, नक्की कारण काय? वाचा सविस्तर.

खळबळजनक..'त्या' लाडक्या बहिणींकडून होणार वसुली, नक्की कारण काय? वाचा सविस्तर.


लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये, असे राज्य सरकारने बजावूनदेखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतली आहे.

त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनांचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या 

दोन महिन्यांचे 3 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, 

कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती. तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारीही

 आल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर आता यासंदर्भात थेट आरबीआयलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या, त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनेतून अर्थसाहाय्य मिळणाऱ्यांनीही ‘लाडकी बहीण’साठी अर्ज केले आहेत.

पुरुष असूनही प्रीतमने घेतला योजनेचा लाभ

मुळशी तालुक्यात एका पुरुष व्यक्तीने ज्याचे नाव प्रीतम आहे त्याने लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून लाभ मिळवला आहे. छाननीमध्ये ही बाब उघडकीस आल्याने महिला

 आणि बालकल्याण विभागाकडून या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. पुरुष असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुणे जिल्ह्यात घडली आहे.

Post a Comment

0 Comments