google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न

Breaking News

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांच्या हस्ते


सांगोला शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने , माजी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली, ,माजी नगरसेवक व शिवसेना शहर उपप्रमुख अस्मिर तांबोळी यांची उपस्थिती

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला शहर व तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. सांगोला शहरात विविध गणेश  मंडळाकडून श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.  

गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते व महायुतीचे माजी गटनेते तथा शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने, माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली , 

माजी नगरसेवक व शिवसेना शहर उपप्रमुख अस्मिर तांबोळी, तसेच प्रसाद जिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. 

जय हिंद गणेश तरुण मंडळ फाईट क्लब इंदिरानगर  सांगोला, भवानी गणेश तरुण मंडळ कट्टाचौक अहिल्यानगर सांगोला, नृसिंह गणेश तरुण मंडळ लोहार गल्ली सांगोला, अमर गणेश तरुण मंडळ वज्राबादपेठ सांगोला, 

बुरुडगल्ली गणेशोत्सव मंडळ जयभवानी चौक सांगोला, जगदंब प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ जय भवानी चौक, गोंधळी गल्ली सांगोला, लंबोदर गणेशोत्सव मंडळ कोष्टी गल्ली सांगोला या गणेशोत्सव मंडळांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. 

या आरतीच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी ,सदस्य, नागरिक युवक वर्ग व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते. उपस्थित मांन्यवरांचा गणेश मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments